दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…
वेगवान नाशिक/ अरूण थोरे
नाशिक: ९ मे २०२४ महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घराण्यात तेढ निर्माण झालेली आपन पाहीली आहे. यात परिस्थितीनुसार मेळ झाल्याचं ही आपन पाहत आलोय. तसलाच प्रकार नाशकात आज पाहण्यास मिळाला केंद्रीय मंत्री भारती पवार व दिर नितिन पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. अजित पवार गटात असलेल्या दिर नितिन पवार यांची भेट भारती पवार यांनी घेतली असून, तेव्हा भारती पवार व परीवाराला अश्रु अनावर झाले.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस
मागील निवडणुकीत दिर नितिन पवार व भारती पवार एकमेकांच्या विरोधात होते, मात्र यंदाच्या निवडणुकीत अजित पवार गट महायुती सोबत असुन, कळवण विधानसभेत नितिन पवार हे आमदार असल्याने, भारती पवारांनी मतविभाजन होऊ नये म्हणुन नितिन पवारांची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.
ब्रेकींगः नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी व्हिडीओ
सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजी मुळे भारती पवार अडचणीत आल्या होत्या. या भेटीनंतर भारती पवारांना फायदा होईलच मात्र कुटुंबातील मेळ झाल्याने भविष्यातील राजकारण सोपे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मेळ किती दिवस टिकेल हेही पाहणे तीतकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.