नाशिक ग्रामीणशेती

लासलगाव -मनमाड रस्त्यावर रायपूर जवळ अपघात, दोन जण ठार


वेगवान नाशिक  / अझर शेख 

मनमाड, ता. 9 – मनमाड( प्रतिनिधी) :- मनमाड लासलगाव रोडवर रायपूर येथे खंडेराव मंदिराजवळ मोटरसायकल व इको गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मनमाडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.

Rain Nashik नाशिक जिल्ह्याला दुस-या दिवशी पावसाने झोडपलं.. video

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्याचा त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे शहरावर शोक काळा पसरली आहे

दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…

याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 तर त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय 21 हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी ए 82 86 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूर कडे निघाले होते.

दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…

याच वेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक एम एच 19 डी व्ही 73 94 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली या धडके पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले.

दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…

दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले मात्र मालेगाव कडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळतात मनमाड शहरावर शोक कळा पसरली आहे या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!