नाशिकचे राजकारण

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे:, नाशिकच्या या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे:, नाशिकच्या या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


वेगवान नाशिक / नवीन नाशिक प्रतिनिधी नितीन चव्हाण ता ९ मे २०२४

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत “दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. या संदर्भात राऊत यांच्या विरोधात आंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

अशा वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.संजय राऊत यांचे मा. पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्वाच्या

विरोधात आहे हे उघड आहे. या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहेत हे स्पष्ट होत असल्याच्या तक्रारीत पेशकार यांनी म्हटले आहे. अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते.

निवडणूक आयोगाला आणि सबंधित अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणांची पुनरावृती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशा आशयाची तक्रार यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिले आहे. यावेळी उद्योग आघाडीच प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ता प्रदीप पेशकार, जगन पाटील,अविनाश पाटील,
रविन्द्र पाटील,प्रविण मोरे,प्रकाश चकोर,यशवंत नेरकर,रजपूत सर,दिनेश मोडक आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!