ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांना तडीपारीची नोटीस
वेगवान नाशिक / नितीन चव्हा
नवीन नाशिक :,ता,९ मे २०२४ – ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे.
तडीपारीची नोटीस घेण्यास बडगुजर यांनी नाकार दिला आहे. बडगुजर हे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणात बडगुजर हे राज्यात चर्चेत आले होते.
शिंदे गटाचे संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी कालच्या मनोहर गार्डन येथे झालेल्या मेळाव्यात बडगुजरांवर निशाना देखील साधला होता.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता हा पॅरल वर होता. त्याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ वायरल ही झाला होता. त्यावेळी ठाकरे गटाचे बडगुजर महानगर प्रमुख पदावर होते
त्यावेळी त्यांची चौकशी क्राइम ब्रांच युनिटने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर बडगुजर हे संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते .वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून नोटीस स्वीकारली जाईल असे यावेळी बडगुजर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तडीपारची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.