नाशिक ग्रामीण
बागलाणच्या पश्चिम भागात पट्टात हलक्या ते मध्यम सरी उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा

अतुल सुर्यवंशी/वेगवान नाशिक
निरपूर, दि.09/05/2024
बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात दुपारी अडीच ते तीन या वेळेच्या दरम्यान पावसाची काही भागात दमदार तर काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावत उकाड्याने हैराण नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
परिसरातील मुंजवाड, चौधाने, कंधाने नवे – जुने निरपूर निकवेल डांगसौंडणे या गावामध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.
