नाशिक जिल्ह्यात हे खत निघालं बोगस…पिकांना टाकू नका!

वेगवान नाशिक
नाशिक , ता. 8 में 2024 – नाशिक उपविभागांतर्गत मे.आडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित खत विक्री केंद्रातून मेसर्स राजलक्ष्मी ॲग्रोटेक इंडिया प्रा. लि. जालना या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट (पावडर) या रासायनिक खताचा नमुना अप्रमाणित ठरला असून, त्याची खरेदी करू नये, असे उपविभागीय कृषि अधिकारी येथील खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी अभिजित घुमरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
पत्रकात म्हटले आहे, नाशिक उपविभागांतर्गत मे.आडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित नाशिक येथील खत विक्री केंद्रातून सिंगल सुपर फॉस्फेट (पावडर) या रासायनिक खताचा नमुना खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, नाशिक या कार्यालयाकून 25 एप्रिल 2024 रोजी तपासणीकरिता घेण्यात आला होता. सदर नमुना खत विश्लेषक प्रयोग शाळा,नाशिक येथे प्रथम विश्लेषणात अप्रमाणित आढळून आला आहे.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
या अप्रमाणित ठरलेल्या खताची बॅग 50 किलो पॅकिंगची असून तिचा बँच क्रमांक / लॉट नं RLJP01 Date 04/2024 असा आहे. शेतकऱ्यांनी या खताची खरेदी करू नये, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
गोदावरी उजवा व डावा तट कालवातून पाणी घेण्यासाठी शेवटची तारिख
