नाशिक ग्रामीण

ब्रेकींगः नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी व्हिडीओ


वेगवान नाशिक / सागर मोर

नाशिक, 9 में 2024 – Rain in Nashik district नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात काल सांयकाळी पावसाने हजेरी लावली आहे..

या अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळ कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. वणी बाजार समितीमध्ये शेतक-यांना ट्रॅक्टरवरील कांदा झाकण्यासाठी धावपळ करावी लागली.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

 

मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस

 

राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. अशातच विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी कामाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भर दिवसा सर्वत्र काळोखासह पावसाला सुरवात झाली आहे. रस्त्यावरील वाहनांना अंधारामुळे दिवसा वाहनाचे दिवे लावावे लागत आहेत. हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!