निफाडःयुवकाची विष प्राशन करून आत्महत्या

वेगवान नाशिक / wegwan nashik
समीर पठाण
लासलगाव, ता. 8 में 2024 डोंगरगाव ता.निफाड येथील ३२ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,भारत शंकर नागरे वय ५५ वर्ष,रा डोंगरगाव यांनी खबर दिली.
चिठ्ठी लिहीत माझा नवरा मला..सारखा.. शेवटचा नमस्कार.. म्हणत…तिने व मुलींनी जग सोडलं
दि ६. मे. २०२४ रोजी सायकाळी ७.३० वाजता ते त्यांची पत्नी सुगंधा व मुलगी पल्लवी यांचेसह स्वामी समर्थ मंदिरातुन घरी परत आले असता त्यांचा मुलगा सागर भारत नागरे वय ३२ याने राहते घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याचे आढळून आले.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
सागर भारत नागरे यास प्रथम लासलगाव ग्रामीण रूग्णालयात नेले मात्र तब्येत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी निफाडच्या खासगी रुग्णालयात त्यास पाठविण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान त्याचे दि. ७ मे रोजी रात्री त्याचे निधन झाले.निफाड ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स.पो.नि.बी.जे.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.संदीप निचळ अधिक तपास करीत आहेत.
नाशिकः चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आईसह दोन मुलींची आत्महत्याःचिठ्ठी पण सापडली
