लासलगाव पाणी प्रश्न बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची दांडी
लासलगाव पाणी प्रश्न बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची दांडी

वेगवान नाशिक / समीर पठाण
लासलगाव, ता. 8 में 2024 –
भर उन्हाळ्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत आज बुधवारी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने बैठक निष्फळ ठरली.
निफाडःयुवकाची विष प्राशन करून आत्महत्या
लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मधमेश्वर धरणाने तळ गाठल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या बैठकीला एमजेपीचे अधिकारी उपस्थित नसल्याने बैठक कोणत्याही निर्णय न घेता संपली.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
या बैठकीला गटविकास अधिकारी महेश पाटील, लासलगावचे माजी सरपंच जयदत्त होळकर,ग्रामीण पाणी पुरवठा पंचायत समिती अभियंता संदीप शिंदे,सर्कल देवकाते,तलाठी नितीन केदार व ग्रामसेवक लिंगराज जंगम उपस्थित होते.
छगन भुजबळांनी येवल्याच्या लोकांना दिला मोलाचा कानमंत्र
सदर बैठकीत प्रामुख्याने एम जी पी चे सक्षम अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होत नाही तोपर्यंत लोकसभा मतदान बहिष्कार कायम ठेवण्याचा नर्णय घेण्यात आला तसेच सदर लासलगाव 16 गाव पाणी योजना ही सुरळीत चालण्यासाठी ही योजना एमजीपी ने स्वतः चालवावी हे दोन प्रमुख निर्णय यावेळी घेण्यात आले,
ब्रेकींगः नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी
या बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य अमोल थोरे,दत्ता पाटील, विकास कोल्हे,संदीप उगले,राजेंद्र कराड,स्मिता कुलकर्णी,नितीन शर्मा,बाळासाहेब सोनवणे,शेखर कुलकर्णी,अनिल ठोके,महेंद्र हांडगे, मयूर झांबरे यांच्यासह ग्रामस्थांनी या चर्चेत सहभाग घेतला.
