नाशिकः अरे बापरे…एवढे उमेद्वार उभे ! ईव्हीएम मशीन मध्ये जागा पुरेना..
वेगवान नाशिक / रविंद्र पाटील
नाशिक, ता. 7 में 2024- भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला निवडणूकीत उमेदवारी करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र निवडणूक कोणती आहे काय आहे. हे न पाहता अनेक जण उमेदवारीसाठी अर्ज भरतात हे आपण पाहिले आहे. प्रत्येकाला वाटत असतं की मीच निवडणूक येईल. आणि मग प्रत्येक जण त्यासाठी अर्ज भरत असतो. नाशिक 31 पैकी एकच व्यक्ती निवडुन येणार आहे. 30 लोकांना मात्र घरी बसावे लागणार आहे. Nashik: There is not enough space in the EVM machine.. oh man… so many candidates!
शेतकंर्यासाठी महत्वाची बातमी: पासून नाफेडसह एनसीसीएफ ची कांदा खरेदी सुरू होणार
यावेळी नाशिक मध्ये उमदेवारांची संख्या जवळ जवळ तीन डजन पर्यंत गेल्यामुळे ईव्हीएमच्या एका मशीन मध्ये उमेदवार बसत नसल्यामुळे नाशिक मध्ये दोन ईव्हीएम मशिन लावले जाणार आहे. या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये यावेळी 31 लोक निवडणूकीच्या रिंगणात आहे. आता कोणी माघार जरी घेतली तरी मशिनवर ते चिन्ह लावले जाणार आहे.
सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?
या उलट दिंडोरीमध्ये एक ईव्हीएम मशीन बसविण्यात येणार आहे. नाशिक लोकसभेसाठी 20 लाख 30 हजार मतदारांसाठी 1910 मतदान केंद्रे आहेत, तर दिंडोरीमध्ये 18 लाख 53 हजार मतदारांसाठी एकूण 1 हजार 922 मतदान केंद्रे आहेत.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा जागांसाठी 20 में ला सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु होणार आहे. संध्याकाळी 6 वाजे पर्यंत हे मतदान चालणार आहे. मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून होईल. अंबड येथील वाडकर निगमच्या सेंट्रल वेअरहाऊसमध्ये.ही मतमोजनी होणार आहे.
Onion export कांदा निर्यात उठविली अन… कांद्याला मिळाला एवढा भाव
दरम्यान, निवडणूक विभागाची जुळवाजुळव करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. P.S. प्रद्युम्न (IAS) हे नाशिक लोकसभा निवडणूक क्षेत्रासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील, तर बिनिता पेगू (IAS) दिंडोरीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहतील.
मतदान केंद्रे आणि निवडणूक क्षेत्र
निवडणूक क्षेत्र……मतदान केंद्र……मतदारांची संख्या
नाशिक…………….१९१०…………………………..२०,३०,१२४
दिंडोरी…………….१९२२…………….१८,५३,३८७
तुम्ही खात असलेल्या मसल्यामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ
कर्मचाऱ्यांची संख्या
नाशिक – 168 क्षेत्र अधिकारी आणि 12,618 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
दिंडोरी – 182 क्षेत्र अधिकारी आणि 11,776 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
वाहने – जिल्ह्यासाठी एकूण 509 बसेस लागणार आहेत. एकूण 1374 वाहने लागणार आहेत.
प्रत्येकी 22 राखीव संघ
नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी 22 संघ नियुक्त करण्यात आले आहेत. दिंडोरीमध्ये 44 तर नाशिकमध्ये 38 कायमस्वरूपी संघ आहेत. चित्रपट निरीक्षणासाठी 12 आणि देखरेखीसाठी 6 पथके नेमण्यात आली आहेत. आंतरजिल्हा परीक्षेसाठी दिंडोरीमध्ये 7 आणि नाशिकमध्ये 4 चौक्या आहेत. आंतरराज्यीय तपासणीसाठी दिंडोरी येथे 4 आणि नाशिकमध्ये 1 केंद्रे आहेत.