नाशिक-भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या संधी
वेगवान नाशिक /
नाशिक, ता. 7 में 2024 भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी 20 ते 29 मे 2024 या कालावधीत एस.एस.बी. कोर्स क्रमांक 57 चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी 17 मे, 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल ओंकार कापले (निवृत्त) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
पत्रकात म्हटले आहे, केंद्रामध्ये SSB कोर्स प्रवेशासाठी उमेदवार हा कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास असावा व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. उमेदवार एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास असावा व एन.सी.सी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस.एस.बी कॉल लेटर किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
नाशिकः अरे बापरे…एवढे उमेद्वार उभे ! ईव्हीएम मशीन मध्ये जागा पुरेना..
अधिक माहितीसाठी training.pctcnashik@gmail.com या ई मेल आयडी अथवा 0253-2451032 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत किंवा 9156073306 या व्हॉटस्अप क्रमांकावर संपर्क साधावा. असेही पत्रकात म्हटले आहे.
सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?
Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार!