नाशिकचे राजकारण

नाशिकः मोठ्या पक्षाच्या या उमेद्वारांना नोटीसः48 तासात खुलासा करा


वेगवान नाशिक / wegwan nashik news 

नाशिक, ता. 7 – Nashik News : निवडणूक विभागाची परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार सुरू केल्याने  जिल्हाधिकारी जलज शर्मा व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी नोटीस नाशिक व दिंडोरीतील पाच उमेद्वारांना नोटीस बजावली आहे.  सोशल मीडियावरील प्रचार तातडीने थांबविण्याचे आदेश देत याप्रकरणी ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश नोटिशीद्वारे बजावले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकः अरे बापरे…एवढे उमेद्वार उभे ! ईव्हीएम मशीन मध्ये जागा पुरेना..

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी माध्यम प्रमाणिकरण समितीची (एमसीएमसी) पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असते. मात्र, सोशल मीडियावर प्रचारासाठी परवानगी घेण्याची आवश्‍यकता नसल्याच्या गैरसमजातून किंवा जाणीवपूर्वक सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी केला जात असल्याचे माध्यम मॉनिटरिंग विभागाच्या निदर्शनास आले आहे.

तुम्ही खात असलेल्या मसल्यामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ

यानंतर त्यांनी उपरोक्त पाच उमेदवारांना सोशल मीडियावरील प्रचार थांबविण्याचे आदेश दिले. येत्या ४८ तासांच्या आत त्यांनी खुलासा करणे बंधनकारक असून, योग्य खुलासा प्राप्त न झाल्यास उमेदवारांच्या माध्यम प्रतिनिधीवर कारवाई करण्यात येईल. तसेच उमेदवारांचीही यामुळे डोकेदुखी वाढणार आहे

नाशिकःबॅंकेतील ग्राहकांचे 5 कोटीचे दागिनेच पळविलेःतुमचं सोनं आहे का गेलं..

“एमसीएमसी विभागाची परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात आम्ही संबंधित उमेदवारांना नोटीस बजावली असून, त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.” – जलज शर्मा, जिल्हाधिकारी

“सोशल मीडियावरील प्रचार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित उमेदवाराने रीतसर परवानगी घ्यावी. परवानगीनंतरच त्यांना सोशल मीडियावर प्रचार करता येईल. यानंतरही त्यांनी व्हिडिओ हटविले नाही तर उमेदवाराच्या माध्यम प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात येईल.” – बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी (दिंडोरी)

विजय करंजकर यांच्यासह शिंदे गटात कोण करणार प्रवेश

निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती, तर दिंडोरीतील महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना भोवण्याची शक्यता आहे.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! Honda’s electric bicycle

Onion export कांदा निर्यात उठविली अन… कांद्याला मिळाला एवढा भाव


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!