नाशिक ग्रामीण

नाशिक- इगतपुरी दरम्यान अपघातःकंटेनरच्या धडकेत कार उलटली


वेगवान नाशिक / Wegwan Nashik News

नाशिक, ता. Nashik news  मुंबई-आग्रा महामार्गावर जिंदाल कंपनीजवळ कंटेनर आणि कारमध्ये धडक होऊन एक कार उलटली. या अपघातात चार जण जखमी झाले.

नाशिकः अरे बापरे…एवढे उमेद्वार उभे ! ईव्हीएम मशीन मध्ये जागा पुरेना..

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

ही घटना आज सकाळी नऊ वाजता घडली. मागून येणाऱ्या कंटेनरने मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या ओमीनी कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे ओमीनी कार पलटी झाली.

तुम्ही खात असलेल्या मसल्यामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ

या अपघातात सामील असलेल्या  कारचा क्रमांक MH 15.DS.8915 असून ती धडकलेल्या कंटेनरचा क्रमांक MH.46.AR.7765 आहे. या अपघातात माणिकखांब येथील चंद्रकांत नारायण आडोळे (32), ज्ञानेश्वर आप्पा पगारे (47), खंबाळे येथील मीराबाई भगत (30), सौरभ राजू कडवे (21) हे जखमी झाले.

सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?

या अपघाताची माहिती फोनवरून मिळताच जगदगुरू नारायण चॅरिटेबल ट्रस्टची मोफत रुग्णवाहिका तातडीने गोंदे फाटा येथील अपघातस्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Onion export कांदा निर्यात उठविली अन… कांद्याला मिळाला एवढा भाव


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!