समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त
वेगवान नाशिक / wegwan nashik
सिन्नर, ता. 6 मेंं 2024- रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समृद्धीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या दोन वाहनांमधून तस्करी होणारा 32 लाखांचा सुमारे 210 किलो गांजा पकडला. सुरक्षारक्षकांना पाहून दोन्ही वाहनांसोबत असलेल्या व्यक्तींनी अंधारात धूम ठोकली.
नाशिकःबॅंकेतील ग्राहकांचे 5 कोटीचे दागिनेच पळविलेःतुमचं सोनं आहे का गेलं..
राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चव्हाणके, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सुरक्षा रक्षक आकाश सानप, ज्ञानेश्वर हेंबाडे संयुक्तपणे समृद्धी महामार्गावर गस्त घालण्यासाठी गोंदे टोल प्लाझा येथून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. खंबाळे शिवारात चॅनल क्रमांक 557 या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक GJ 23/AT 8323 व सुझुकी कॅरी छोटा हत्ती टेम्पो MH 05/FJ 539 महामार्गावर मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर उभा होता. त्या ठिकाणी वाहनांमधून काही गोण्या क्रॉसिंग करण्यात येत असल्याचे पथकाचे निदर्शनास आले.
शेतकंर्यासाठी महत्वाची बातमी: उद्या पासून नाफेडसह एनसीसीएफ ची कांदा खरेदी सुरू होणार
पोलिसांनी थांबून विचारपूस केली असता दोन्ही वाहनांसोबत असणाऱ्या व्यक्ती अंधाराचा फायदा घेत समृद्धीची सुरक्षा भिंत ओलांडून पसार झाल्या. या वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र सुरक्षा फोर्स चे प्रभारी मिलिंद सरवडे यांनी याबाबत वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना कळवले.
जे.पी.गावितांची माघार कोणाच्या पथ्यावर !
श्री. पवार यांच्यासह उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, सचिन काकड, गोविंद सूर्यवाड, साहेबराव बलसाने, सचिन कहाने यांनी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. दोन्ही वाहनांमधून हस्तगत केलेल्या गोण्यांमध्ये असलेल्या गांजाचे वजन दोन क्विंटल 15 किलो भरले. त्याची बाजारातील किंमत सुमारे 43 लाख रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या वाहनांची किंमत 63 लाख हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलीस संशयितांचा परिसरात शोध घेत होते.
सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?
बॉक्स…
अपघात ग्रस्त पिकअप मध्ये दोन टन गोमांस
समृद्धी महामार्गावरच दुसऱ्या घटनेत वाहतूक करण्यात येणारे दोन टन गोवंश मांस देखील मिळून आले. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रभारी मिलिंद सरवदे यांना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गी केवळ शिवडे शिवारात चॅनल क्रमांक 582 वर एका पीक जीपचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना रुम मधून बाहेर काढले व्हिडीओ व्हायरलं
गोंदे टोल प्लाजा येथील मदत पथक अपघात स्थळी पोहोचल्यावर टायर फुटून पिकअप जीप क्रमांक MH13/CJ596 पुलाच्या भिंतीला दडपून अपघातग्रस्त झाली होती. या जीपमध्ये गोमांस असल्याचे निदर्शनास आल्यावर सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळवण्यात आले. सिन्नर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले.
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.