प्राण्यांची तहान भागवण्यासाठी शेतामध्ये कृत्रिम पाणवठे
वेगवान नाशिक
सिन्नर, ता. 6 में 2024 – उन्हाची दाहकता, चारा व पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या संख्येने मोर, हरीण, तरस, लांडगे या प्राण्यांचा वावर आहे. मात्र पाण्याअभावी या प्राण्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून वनविभागाने स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्यातून कृत्रिम पानवठयानची व्यवस्था केली आहे. प्लास्टिकचे बॅरल आडवे कापून पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतांमध्ये वन्य प्राण्यांसाठी ते ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी येऊन भटकंती करणारे वन्यप्राणी आपली तहान भागवत आहेत.
समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त
पाण्याच्या शोधात मोर, हरीण व अन्य प्राणी थेट मानवी वस्तीजवळ येत आहेत. सिन्नरच्या पूर्व भागात सर्वच ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाळीव प्राण्यांना पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जाते. मात्र वन्य प्राण्यांना तहान भागवण्यासाठी भटकंती करावी लागते. कित्येक किलोमीटर भटकंती करून पाणी मिळत नसल्याने या प्राण्यांच्या उष्माघात व उपासमारीने मृत्यू झाल्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत.
नाशिकःबॅंकेतील ग्राहकांचे 5 कोटीचे दागिनेच पळविलेःतुमचं सोनं आहे का गेलं..
वावी येथील प्राणिमित्र संतोष वर्पे, प्रयोगशील शेतकरी व शासनाचा वनश्री पुरस्कार विजेते राम सुरसे यांनी वनविभागाने या प्राण्यांसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, नांदूर शिंगोटे वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांनी प्लास्टिक बॅरलच्या साह्याने ठिकठिकाणीच्या वस्त्यांवर मोर व वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पानवठयानची व्यवस्था केली आहे.
शेतकंर्यासाठी महत्वाची बातमी: उद्या पासून नाफेडसह एनसीसीएफ ची कांदा खरेदी सुरू होणार
वावी, पिंपरवाडी, मीठसागरे या भागात मोरांचे वास्तव्य आहे. हरिणांचे कळप या भागात आहेत. याशिवाय तरस, लांडगे यासारखे प्राणी देखील आहेत. या सर्व प्राण्यांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम पानवठे असणारे प्लास्टिक बॅरल योग्य पर्याय ठरत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांच्या शेतामध्ये सावलीला व वन्य प्राण्यांना दिसेल अशा ठिकाणी हे बॅरल ठेवण्यात आले आहेत. वन विभागाने हे बॅरल उपलब्ध करून दिले आहेत. संबंधित शेतकरी त्यात सकाळी व सायंकाळी पाणी भरून ठेवतात. त्या ठिकाणी येऊन वन्य प्राणी आपली तहान भागवतात.
दुष्काळी व कोरडवाहू असलेल्या पूर्व भागात मोर, हरीण यासारखी दुर्मिळ वनसंपदा मोठ्या प्रमाणात अस्तित्व टिकवून आहे. पावसाळा व हिवाळ्याचा कालावधी सोडला तर उन्हाळ्यात या प्राण्यांची पाण्यासाठी नेहमीच परवड होते. अशावेळी मानवी वस्ती कडे पाण्याच्या शोधात आलेले हे प्राणी कुत्र्यांची शिकार होतात. अनेकदा माणसांकडून देखील त्यांची शिकार केली जाते. त्यामुळे वनविभागाने निर्जन असलेल्या ठिकाणी सिमेंटचे तळे तयार केल्यास त्याचा वर्षभर फायदा या प्राण्यांना होईल. अनेक शेतकरी त्यांच्या पडीत असलेल्या शेतामध्ये तळ्यांसाठी जागा द्यायला तयार आहेत. वन विभागाने तळे बांधून द्यायचे आहे. शक्य होईल तोपर्यंत या ठिकाणी शेतकरी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करतील.
-संतोष वर्पे, प्राणी मित्र
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.