तुम्ही खात असलेल्या मसल्यामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ

वेगवान नाशिक
नवी दिल्ली:, ता. 6 में 2024 तुम्ही घरी वापरत असलेले मसाले जसे की धने पावडर, हळद पावडर आणि इतर मसाले खरे आहेत की बनावट आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे. कारण दिल्लीत जवळपास 15 टन बनावट मसाले जप्त करण्यात आले आहेत. मसाल्यांऐवजी केवळ लाकूड चिप्स आणि ऍसिडचा वापर केला जात होता.
समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त
ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दोन मसाल्यांच्या कारखान्यांवर छापे टाकले आणि 15 टन बनावट मसाले सापडले. पोलिसांनी मसाला प्रक्रिया युनिटच्या मालकांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.
दिलीप सिंग (वय ४६), सर्फराज (वय ३२), खुर्शीद मलिक (वय ४२) यांच्यासह संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे लोक मसाल्यात भेसळ करून स्थानिक बाजारपेठेत विकायचे. खऱ्या मसाल्यांपेक्षाही कमी किमतीत या बनावट मालाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी उघड केले.
समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त
बनावट मसाल्यांबरोबरच पोलिसांनी झाडाची सालाची पाने, खराब झालेले गहू आणि तांदूळ, लाकूड पावडर, मिरचीची पेटी, ॲसिड आणि तेलही जप्त केले. गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पावेरिया यांनी ही माहिती दिली.
शेतकंर्यासाठी महत्वाची बातमी: उद्या पासून नाफेडसह एनसीसीएफ ची कांदा खरेदी सुरू होणार
दिल्लीत काही उत्पादक आणि दुकानदार वेगवेगळ्या ब्रँडचे बनावट मसाले विकताना आढळून आले. दिल्ली पोलिसांना ही माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आल्याचे डीसीपी पावेरिया यांनी सांगितले. एक टीम तयार करून 1 मे रोजी छापा टाकण्यात आला.
नाशिकःबॅंकेतील ग्राहकांचे 5 कोटीचे दागिनेच पळविलेःतुमचं सोनं आहे का गेलं..
कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंग आणि सर्फराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सिंग याने कंपनीचे मालक असल्याचे मान्य केले आहे. पुढील तपासात काली खाटा रोड, करवल नगर येथे दुसरे प्रोसेसिंग युनिट उघड झाले. तेथे सर्फराजला पकडण्यात आले.

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.