लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर ग्रामीण पोलीस दलाची कारवाई

वेगवान नाशिक /समीर पठाण
लासलगाव: ६ मे २०२४
लासलागव, ता. 6 में 2024- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच अवैध हालचालीचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे.
तुम्ही खात असलेल्या मसल्यामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ
लोकसभा निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हयातील गुन्हेगारीचे पार्श्वभुमीवर सराईत गुन्हेगार, समाजकंटक तसेच संशयीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्हयात अवैधरित्या दारू व्यवसाय करून समाजात अशांतता पसरविणा-यां विरोधातही सत्वर कारवाई करण्यात येत असुन छापेमारी सुरू आहे. जिल्हयाचे सीमावर्ती भागातुन अवैधरित्या होणारे मद्यवाहतुकीस प्रतिबंध होणेसाठी सरहद्द पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असुन चेकपोस्टवर फिक्स पॉईंट नेमण्यात आले आहे. तसेच आंतरराज्य व आंतरजिल्हयातील गुन्हेगारांच्या हालीचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरहद्दीवर नाकाबंदी लावण्यात येवुन सत्वर चेकिंग सुरू आहे. तसेच शस्त्र परवानाधारकांकडे असलेले शस्त्रे जमा करण्यात आली असुन अवैधरित्या शस्त्रे बाळगणा-या संशयीतांची गोपनीय माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त
जिल्हयातील कायदा व सुवव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह, समाजविघातक कृत्य करणारे इसमांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असुन या गुन्हेगारांना विशिष्ट कालावधीसाठी जिल्हयातुन हद्दपार केले जाणार आहे. निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हयातील पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत असुन जिल्हयातील सर्व मतदान केंद्र व संवेदनशील मदतान केंद्राची माहिती घेण्यात येत आहे. तसेच पोलीस ठाणे निहाय व मुख्यालय स्तरावर पथसंचलन, मॉकड्रिलची प्रात्यक्षिके करून घेण्यात येत आहे. नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट स्किम राबविण्यात येत असुन, रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, अवैध धंदे करणारे संशयीतांना चेक करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जिल्हा अभिलेखावरील गुन्हयांमध्ये फरार व पाहिजे असलेले आरोपीतांचा मागमुस काढुन अटक करण्याची कारवाईही सुरू आहे. जिल्हयात निवडणुकीचे अनुषंगाने दि. १६ मार्च २०२४ रोजी पासुन जिल्हयात सध्यास्थितीत ३२ सराईत गुन्हेगार हद्दपार आहेत. आणखी ५० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे. एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०४ प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करून २१ केसेस दाखल करण्यात आलेल्या असुन त्यात ०५ देशी बनावटीचे पिस्टल, १५ धारदार तलवारी, ०८ कोयते/चॉपर, फायटर अशी अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.निवडणुकीचे पार्श्वभुमीवर शस्त्र परवाना असलेले एकुण ७५१ अग्निशस्त्रे जमा करण्यात आलेली आहे.
समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त
सीआरपीसी १०७ अन्ये ९७३ सदस्य, प्रतिबंधात्मक कारवाई सीआरपीसी १०८ अन्वये १० उमेदवार, सीआरपीसी १०९ अन्वये ७३ सदस्य, सीआरपीसी ११० अन्वये २९ सदस्य, सीआरपीसी १५१ अन्वये २५, दि.१६ मार्च ते आज पावेतो दारूबंदी कायद्यान्वये एकुण ११२६ केसेस करण्यात आलेल्या असुन ८७,४४० लिटर देशी-विदेशी/गावठी दारू साठा जप्त, तसेच अवैध गुटख्याच्या ७८ केसेस अशा दोन्ही मिळुन १२७२ केसेस दाखल करण्यात आल्या असून एकुण किं. रू. ३,५३,५२,२६२/- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत, अवैध वाहतुकीच्या एकुण १२१ केसेस दाखल, विनाहेल्मेट, नोपार्किंग, बेदरकार पणे वाहन चालविणे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह इत्यादी हेडखाली एकुण ८५४८ इसमांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई, ७५,७४,०५०/- रू. चा दंड जिल्हयातील ४० पोलीस ठाणे निहाय एकुण १६६५ वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे, जिल्हा अभिलेखावरील गुन्हयात पाहिजे असलेले एकुण ५७ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
शेतकंर्यासाठी महत्वाची बातमी: उद्या पासून नाफेडसह एनसीसीएफ ची कांदा खरेदी सुरू होणार
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे जिल्हयातील ४० पोलीस ठाणे, ०८ उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार असे वरील प्रमाणे दररोज कारवाई करीत असुन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.