विजय करंजकर यांच्यासह शिंदे गटात कोण करणार प्रवेश
विजय करंजकर यांच्यासह शिंदे गटात कोण करणार प्रवेश
वेगवान नाशिक / नितीन चव्हाणनवीन नाशिक, ता. ५ में २०२४
नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर हे आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री दादा भुसे,सचिव भाऊसाहेब चौधरी, राजू अण्णा लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, व नासिक मधील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून मेळावा घेत लढणार व नडणार असा इशारा दिला होता.
दरम्यान आज ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते उद्या माघारीची अंतिम मुदत असल्याने बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहे.
शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची उपनेतेपदी नियुक्ती झाल्याने प्रवेश करताच विजय करंजकर यांची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विजय करंजकर हे माजी नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य,यांच्यासह प्रवेश करणार असल्याचे समजते