नाशिकचे राजकारण

शिवसेनेतील राजकारण अत्यंत वाईट व घाणेरडे! माणसाची कदर नाही


वेगवान नाशिक / wegwan nashik news

देवळाली कॅम्प, ता. 5 में 2024 – गेल्या 14 वर्षांमध्ये आपण शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना अनेक तळागाळातील शिवसैनिकांना मोठे केले असून त्यासाठी मोठा त्याग केला आहे मात्र पक्षाने आपली कदर केली नसल्याचे सांगताना आपण शिवसैनिक म्हणून आपली निष्ठा कायम मातोश्रीशी ठेवली आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख व लोकसभेसाठी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विजय करंजकर यांनी नाशिक मधील पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेताना आपण या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करत लढणार व लढणार असल्याचे देवळाली कॅम्प येथील मिशन 2024 नाशिक लोकसभा या समर्थकांच्या मेळाव्यामध्ये सांगितले.

नाशिक मध्ये हे उमदेवार आहे पैशावाले

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

कांदा निर्यात उठविल्याचा निर्णय म्हणजे बैल गेला आणि झोपा केला

देवळाली कॅम्प येथील ओरिएंट गेस्ट हाऊस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या समर्थक व हितचिंतक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब लांबे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार माजी नगरसेविका मंदाताई दातीर भागवत आरोटे स्वर्गीय खासदार राजाभाऊ गोडसे यांचे सुपुत्र युवराज गोडसे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख पवन आडके, अशोक पडोळ संजय गायकवाड विकास शिरसाट पाटी, लहवित येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पी एल गायकवाड प्रवीण पाळदे वैभव पाळदे नितीन करंजकर दीपक खुळे अतुल धोंगडे पंडित कातोरे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ‘विजू काका वाट लावून टाका’ ,’हमारा खासदार कैसा हो विजय करंजकर जैसा हो’, विजय आप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी उपस्थित समर्थकांनी घोषणाबाजी केली. फटाक्याच्या आतिषबाजीत विजय करंजकर यांचे मेळाव्यात स्वागत करण्यात आले.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! Honda’s electric bicycle

याप्रसंगी बोलताना विजय करंजकर यांनी आपण महिनाभर थांबूनही आपले काय चुकले हे पक्षाने स्पष्ट केले नसल्याचे सांगत आपल्याला यापूर्वी दोन वेळा उमेदवारी करण्याची संधी असताना देखील केवळ पक्षादेश म्हणून आपण माघार घेतली मात्र यावेळी आपल्याला विश्वासात न घेता सिन्नरचे माजी आमदार प्रकाश वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तरीही आपण संयमाची भूमिका घेत पक्षप्रमुखांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला .

आता तुमच्या पोरा-पोरीचे लग्न होणार नाही !

मात्र त्यांनी वेळोवेळी आपल्याला भेटण्यासाठी टाळाटाळ केली असल्याचे स्पष्ट केले .यावेळी आपल्या मनोगतातून विविध मान्यवरांनी हाडाचे शिवसैनिक असलेल्या विजय करंजकरांना बाजूला करणाऱ्यांना माफी नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते घडवणारा नेता विजय करंजकर असल्याचे संदीप गुंजाळ यांनी सांगितले तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे यांनी संघटन कौशल्यात विजय करंजकर हे अधिक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित आहे.

……”पेटवा मशाली,” भुजबळ समर्थकांच्या त्या मेसेजचा चा अर्थ काय?

बबन कांगणे यांनी रडायचे नाही तर लढायचे अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी मनपाचे माजी नगरसेवक बाजीराव भागवत यांनी बाळासाहेबांचे विचार जिल्हाभरात रुजविणारे विजय करंजकर हे एकमेव व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले.याप्रसंगी विलास कड मंदाताई दातीर दीपक खुळे पवन आडके नवनाथ गायधनी संदीप गुंजाळ शाम गणोरे नितीन चिडे आदींची समायोजित भाषणे झाली. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत गोडसे प्रमोद आडके प्रवीण आडके वैभव पाळदे नितीन करंजकर गजरा मुठाळ दिलीप चव्हाण बाजीराव जाधव ज्ञानेश्वर चव्हाण शरद गायके ज्ञानेश्वर शिंदे सचिन मुठाळ आदींसह विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सोसायटी सदस्य महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रयत्नशील होते. सुत्रसंचालन संग्राम  करंजकर तर आभार विक्रम सोनवणे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!