निफाड:शॉर्ट सर्किट मुळे द्राक्ष बागेचे नुकसान
वेगवान नाशिक/अरुण थोरे
दिनांक ५मे-शिरवाडे वाकद (ता.निफाड) येथे
विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीने द्राक्षबागेचे १०० झाडे जळालेची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ५ मे दुपारच्या दरम्यान मुख्य विजवाहीनीवर वाऱ्याच्या झुळकेणे शॉर्ट सर्किट होऊन तारे खालील चाऱ्याला आग लागुन जवळच असलेल्या खंडेराव मुरलीधर यादव यांच्या मालकीच्या द्राक्ष बागेला आग लागुन सुमारे १०० झाडांना आग लागुन खाक झाले आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सदर शेतकऱ्यावर मोठं संकट आले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.