नाशिकचे राजकारण

जे.पी.गावितांची माघार कोणाच्या पथ्यावर !


वेगवान नाशिक / अरुण थोरे 

नाशिक, ता. 5 में 2024-  राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बऱ्याच दिवसांपासून जे पी गावित यांची मनधरणी सुरू असताना शरद चंद्र पवार गटास यश आले असून जे.पी.गावित यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे ह्या माघारीचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना होणार आहे. मागील निवडणुकीत जे. पी गावित यांना एक लाखांपेक्षा जास्त मते मिळाल्याने ही मते निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना रुम मधून बाहेर काढले व्हिडीओ व्हायरलं

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीसाकडे महाराष्ट्रातील एकमेव जागा मागितली होती, मात्र शरद पवार गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने माकपची नाराजी होती. म्हणून गावीतांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र मतविभाजनाचा फायदा महायुतीला होताना दिसत असल्याने हा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी पवार गट व माकपच्या नेत्यांनी सांगितले आहे.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! Honda’s electric bicycle

एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीताई पवार यांना कांदा निर्यात बंदीच्या धोरणावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड विरोध होत असताना महाविकास आघाडीसाठी जे.पी गावीतांची माघार महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. सुरगाणा व कळवण तालुक्यात गावीताचं वर्चस्व असल्याने भास्कर भगरेंना मोठा दिलासा मिळाल्याच बोललं जातं आहे.

सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?

एकीकडे हरिश्चंद्र चव्हाण यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आता चव्हाणांच्या माघारीचे भाजपसमोर आव्हान असणार आहे. चव्हाणांच्या मनधरणीस भाजपला यश आल्यास भारती पवारांचा मार्ग सुकर होईल.

विधानसभा डोळ्यासमोर  ठेवून बघितले तर असा गोंधळ उडणार 

नाशिकः खंडणीखोर देवरे ला पुन्हा अटक

विधानसभा निवडणूकीचे गणित डोळ्या समोर ठेवून सध्या जे.पी. गावित यांचे राजकारण सुरु आहे. मात्र जे.पी. गावित यांच्या सोबत संपूर्ण  मतदान भगरेंना होणार की काही मतदान जर फुटले तर त्याचा फायदा भारतीताई पवारांना होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागील निवडणूकीत जे.पी.गावित यांना लाखाच्या आसपास मते होती. तेंव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आता येवळी जे.पी.गावितांची उमेदवारी नसणार आहे. त्यामुळे जे.पी. गाविताचे 1 लाख मते सगळी तर भगरे यांना जाणार नाही. या मतामध्ये फुटतुट होणार आहे. यामुळे जे.पी.गाविताच्या उमेदवारी थांबल्यामुळे याचा फायदा भारतीताई पवार यांनाही होईल  असेही बोललं जातं आहे.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!