सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?
वेगवान नाशिक/ अरूण थोरे
नाशिक/५ मे २०२४
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबिनच्या दरात तेजी आली असुन, महत्त्वाचा सोयाबिन उत्पादक देश ब्राझिल मध्ये पुर आल्याने सोयाबिन पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. improvement-in-the-price-of-soybeans-due-to-this-reason-will-prices-increase-in-the-future
शरद पवारांनी उध्दव ठाकरें रुम मधून बाहेर काढले व्हिडीओ व्हायरलं
ब्राझिल हा सर्वाधिक सोयाबिन उत्पादन घेणारा देश असल्याने,ब्राझिल मधील पुरपरस्थिती चा फायदा भारतीय सोयाबीन उत्पादकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण, शुक्रवारी प्रोसेसिंग प्लांटसनी ४८०० रुपयांपर्यंत सोयाबिन खरेदी केला तर बाजार समितीत ४६०० रूपया पर्यंत भाव सोयाबीन ला मिळाला आहे.
नाशिकः खंडणीखोर देवरे ला पुन्हा अटक
सद्य स्थितीत महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा केला असून, भावात सुधारणा झाल्यास त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या सहा- सात महिन्यांपासून शेतकरी भाव वाढीची वाट पहात असुन, केंद्राने निर्यातीकडे लक्ष दिल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
शिवसेनेतील राजकारण अत्यंत वाईट व घाणेरडे! माणसाची कदर नाही
ब्राझिल मध्ये सोयाबिन चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत असल्याने जागतीक स्तरावर सोयाबिन तेजीत राहण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करताना दिसत आहेत. त्याचे भारतीय बाजारपेठेत काय परिणाम होतील हे पुढील काळात स्पष्ट होईल.
Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार!
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.