नाशिक क्राईम

खंडणीखोर देवरे ला पुन्हा अटक

खंडणीखोर देवरे ला पुन्हा पोलिसांनी का केली अटक

वेगवान नाशिक / नितीन चव्हाणसिडको , ता. ५ में २०२४

कर्जदारांना दरमहा दहा टक्के व्याजदराने कर्ज देत, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने कर्जवसुली करून, त्यांना छळणाऱ्या खासगी सावकार वैभव देवरे यास इंदिरानगर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. वैभव विरोधात खंडणी, विनयभंगासह महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार पाच गुन्हे दाखल आहेत.

Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

त्यातील तिसऱ्या गुन्ह्यात वैभवला अटक केली आहे.सिडकोतील भाजप पदाधिकारी जगन पाटील यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी वैभवकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

व्याजासह मुद्दल परत करूनही वैभवने पाटील यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता स्वतःसह नावावर केली. तसेच पाटील यांना बंगला विकण्यास भागपाडून, त्या व्यवहारातून आलेल्या पैशांपैकी ५० लाख रुपये इतरांच्या बँक खात्यात घेतले. त्यानंतरही पुन्हा कोट्यवधी रुपयांची मागणी करीत पाटील यांना वैभवने त्रास दिला.

Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी वैभवसह इतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, वैभव यास पहिल्या दोन गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

त्याने इतर तीन गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने वैभवची अटक टळली होती. अखेर पोलिसांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने वैभवचे अटकपूर्व अर्ज फेटाळले. त्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार शनिवारी (दि.४) इंदिरानगर पोलिसांनी वैभवला पुन्हा अटक केली.

Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!