सिन्रर पोलीसांनी साधूसह दोघांचा गांजासह काढला धुर

वेगवान नाशिक
सिन्नर, ता. 4 एप्रिल 2024 – तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीमध्ये वावी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिकप जीप मधून वाहतूक करण्यात येणारा ८६ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत चिंचोली गुरव ता संगमनेर येथील कथीत साधुसह आणखी दोघांना अटक करण्यात आली. गांजाची कारवाई केल्यामुळे साधूसह दोघांचा पोलीसांनी चांगलाच समाचार घेतल्यामुळे तालुक्यात पोलीसांनी साधूसह दोघांचा गांजासह धुर काढल्याची चर्चा रंगत आहे.
आता तुमच्या पोरा-पोरीचे लग्न होणार नाही !
अर्र..दिंडोरी लोकसभा मतदार संघातील या लोकांचे अर्ज बाद
चास – नांदूरशिंगोटे मार्गे गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीमध्ये वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी रस्त्यापासून आत काही अंतरावर संशयास्पद उभ्या असलेल्या महिंद्रा पीकअप जीप एमएच १७ सीव्ही १५८१ मध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये गांजा मिळून आला. पोलिसांनी पिकप मधील कथित साधू योगी पवननाथ बाबा शक्तीनाथ (३९) धंदा पुजारी, रा. पुष्कर (राजस्थान), हल्ली राहणार स्वामी समर्थ केन्द्रा जवळ, चिंचोली गुरव ता. संगमनेर , जीप चालक गोरख गोपीनाथ भादेकर (४१) रा.चिंचोली गुरव, शरद रामनाथ शेळके (४३) रा. नांदूरशिंगोटे या तिघांना ताब्यात घेतले.
Onion export कांदा निर्यात उठविली अन… कांद्याला मिळाला एवढा भाव
……”पेटवा मशाली,” भुजबळ समर्थकांच्या त्या मेसेजचा चा अर्थ काय?
त्यांचें जवळून तीन गाण्यांमध्ये भरलेला चार किलो ३०० ग्रॅम वजन असलेला ८६ हजार रूपये किमतीचा गांजा, १३ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल फोन, सात लाख रूपये किमतीची पीकअप जीप जप्त करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, साहेबराव बलसाने, किरण पवार, महिला पोलीस शिपाई चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
भारतीताईच्या विजयासाठी केंद्राची खेळीःकांदा निर्यात उठविली ! हा व्हिडीओ पोहचला केंद्रात

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.