शेती

भारतीताईच्या विजयासाठी केंद्राची खेळीःकांदा निर्यात उठविली ! हा व्हिडीओ पोहचला केंद्रात

Shetka-i.e. Kendrala Jhukville: Kandyachi export opened


वेगवान नाशिक /

नाशिक,ता. 4 में 2024 –  नाशिक जिल्ह्यामधून कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी गेल्या वर्षापासून ओरड सुरू होती ,मात्र  केंद्र सरकारने कुठलीही कार्यवाही केलेली दिसत नाही.  मात्र ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमधून भाजपा विषयी ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या भाजपा विरोधी असल्यामुळे केंद्र सरकारला अक्षरशा मजबूर व्हावे लागलं.

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांना पराभवाचा सामना करावा लागु नये म्हणून तसेच वेगवान मराठी वर भारतीताई यांच्या विरोधातील प्रतिक्रियांचा व्हिडीओ केंद्रा पर्यंत गेल्यामुळे केंद्र सरकाराने कांदा निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे..वेगवान मराठीवर शेतक-यांच्या प्रतिक्रिया पहा..

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

वेगवान मराठीने ज्या शेतकऱ्यांच्या ग्राउंड रिपोर्ट घेतला त्या रिपोर्टमध्ये शेतकऱ्यांचा पूर्ण भाजपाला विरोध आहे. या विरोधामुळे केंद्र सरकार देखील हातबल झालेले आहे. कारण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया भाजपासाठी घातक आहे. भाजपाला एकही खासदार गमवायचा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला.

डिजिटल चे योग असल्यामुळे व्हिडिओ तात्काळ कुठेही पोहोचू शकतो आणि युट्युब तर संपूर्ण जगात दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या  प्रतिक्रिया मोदी विरोधी होत्या. आम्हाला ही भिती वाटेत की मोदी तर कधीही उचलून नेईल. मोदींनी शेतकऱ्यांचे वाटोळ केलयं आहे. भारती ताईंनी आमच्यासाठी काय केलयं. भारती ताईंना यावेळेस आम्ही मतदान करू शकत नाही. कांद्याविषयी शेतकऱ्यांची पूर्णता वाट लावलेली आहे. .अशा अनेक प्रतिक्रिया शेतक-यांनी व्यक्त केल्या.

वेगवान मराठीचा व्हिडीओची  केंद्राकडून दखल घेतली गेली आहे. मोदी सरकारसाठी दिंडोरी असो की महाराष्ट्रातली कुठलीही जागा गमवने योग्य नाही .कारण केंद्रीय मंत्र्यांचा पराभव होणे हे भाजपाच्या दृष्टीने खूप घातक आहे. त्यामुळे मोदी सरकारने तात्काळ कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत काय या निर्णयामुळे काही झालं तरी शेतकऱ्यांचा मात्र विजय झाला आहे.

स्वस्त मोबाईल फक्त 6999 मध्ये क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!