शेती बाजारभाव

Onion export कांदा निर्यात उठविली अन… कांद्याला मिळाला एवढा भाव

Onion export has been raised and... Onion got such a price


वेगवान नाशिक /  रविंद्र पाटील, समीर पठाण

लासलगाव, ता. 4 एप्रिल 2024 –  दि. 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला होता. त्यानंतर NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला असून याचे निर्यातदारांनी स्वागत केले आहे.

भारतीताईच्या विजयासाठी केंद्राची खेळीःकांदा निर्यात उठविली ! हा व्हिडीओ पोहचला केंद्रात

या पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीत (lasalgaon Bajar Samiti) कांद्याला सरासरी 2 हजार 300 रुपये भाव मिळत आहे. तर जास्तीत जास्त 2 हजार 551 भाव मिळतोय. कालच्या आणि आजच्या दरात सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे नोटीफिकेशन निघाल्यानंतर कांद्याचा दरात सुधारणा झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आता तुमच्या पोरा-पोरीचे लग्न होणार नाही !

लासलगाव बाजार समितीतील शुक्रवारचे कांद्याचे दर
कमीत कमी – 700
जास्तीत जास्त – 1 हजार 801
सरासरी – 1 हजार 551

……”पेटवा मशाली,” भुजबळ समर्थकांच्या त्या मेसेजचा चा अर्थ काय?

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार?

कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी संवाद साधताना म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की, काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा. या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य 550 प्रति मेट्रिक टन असेल. त्यामुळे आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये, निर्यात पूर्ण खुली झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कांदा भावात सुधारणा

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!