नाशिकः प्रेमं…. त्या दोघांनी निवडला वणी गडावरील शीतकडा…
वेगवान नाशिक / सागर मोर
वणी, ता. 4 में 2024 – आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सप्तशृंगी गडावरवर मंगेश राजाराम शिंदे वय २४ वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक व प्रियंका संतोष तिडके वय १६ वर्ष रा. वडनेरभैरव ता. चांदवड जि. नाशिक हे मोटर सायकल क्र. MH-15-HJ-5915 हिचेवर वडनेर भैरव ता. दिंडोरी जि. नाशिक येथुन दि. २८ एप्रिल सप्तश्रृंगी गडावर आले होते.
सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येवून सुमारे चारशे ते पाचशे फुट खोल दरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. शीतकड्यावरुन उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह हे झाडाला अडकलेले तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेले आढळला.
घटनेस साधारण सहा दिवस होवून गेलेले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. याबाबत भातोडे, ता. दिंडोरी चे पोलिस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी माहिती दिल्यानंतर वणी पोलिसांत खबर दिली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशा दरी चढून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर युवक व युवतीचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहीती असून याबाबत पोलिस अधिक चौकशी करीत आहे.