बंद घराच्या कडी कोंडा तोडून, चोरट्यांनी केली एवढ्या लाखांची चोरी
बंद घराच्या कडी कोंडा तोडून, चोरट्यांनी केली एवढ्या लाखांची चोरी
वेगवान नाशिक / नितीन चव्हाण सिडको नाशिक, ता. २ में २०२४
बंद घराचा कळीकोंडा तोडून सोने चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेल्याची घटना सिडकोतील कामटवाडे या परिसरात घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेखा सोनवणे( रा योगेश्वर संकुल कामटवाडे) या दिनांक एक मे रोजी परिवारासह कामानिमित्त गावाला गेल्या असता त्यांचा मुलगा भूषण हा रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घरी आला असता त्याला घराचा कळीकोंडा तुटलेल्या दिसला त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाट तुटलेल्या अवस्थेत दिसले
त्यावेळेस कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपये रोख व सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 13 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून आज्ञात चोरट्यांनी चोरून नेला
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत