नाशिक क्राईम
चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकवणाऱ्यांना पोलिसांनी ही दिली शिक्षा….
वेगवान नाशिक / नितीन चव्हाण,सिडको नाशिक,ता. ३ में २०२४
- चाकूचा धाक दाखवून जबरीने मोबाईल हिसकवणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी चुंचाळे पोलीसांनी सापळा रचत सिताफिने ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड एमआयडीसी परीसरात दोन दिवसांपूर्वी रिक्षातून आलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला होता या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता
- याबाबत पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी
सिमेन्स कंपणी समोर, अंबड लिंक रोड, अंबड या ठिकाणी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचत संशयित आरोपी
अश्रेय रमेश लहाणे,( वय २२, ) गणेश विठ्ठल खंडांगळे, (वय २२) क्रिष्णा बाळू कापसे, (वय २० ) रा सर्वे, घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक.) यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीचे मोबाईलसह गुन्हयात वापरेलेली रिक्षा व चाकु असा एकूण ८२,२०० रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे - . सदरची कारवाई
अंबड एम.आय.डी.सी. चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक, मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक संदीप रामदास पवार, जनार्दन
ढाकणे,, श्रीहरी पांडरंग बिराजदार, सुरेश रामु जाधव, किरण सोनावणे, अर्जुन कांदळकर, समाधान चव्हाण, हेमंत आहेर, अनिल कुन्हाडे, संदीप खैरणार यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.