नाशिकः शहरातील १२ गुन्हे दाखल असणा-या आरोपी बाबत काय घडले
सराईत गुन्हेगाराची कारागृहात रवाणगी

वेगवान नाशिक
जुने नाशिक, ता २मे २०२४ मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या सराईत गुन्हेगारास नाशिक शहर पोलिसांनी एम. पी. आय. डी. कायद्यानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. शौकत सुपडू शहा (२८, रा. सादीकनगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
बहीण-भावाचा डबक्यात बुडून मृत्यू, सिन्नर तालुक्यातील घटना
पोलिसांच्या माहितीनुसार, शौकत विरोधात जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड, दंगा करणे, शस्त्रांचा धाक दाखवने, मारहाण करणे अशा प्रकारचे १२ गुन्हे दाखल आहेत. वारंवार सूचना करूनही शौकतच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यास मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
नाशिक व दिंडोरी मतदार संघात असे किती लोक उभे राहणार! एवढे अर्ज गेले
चार महिन्यांत सहा जणांवर कारवाई
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार चालू वर्षात एमपीडीए कायद्यानुसार आत्तापर्यंत सहा सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices
