नाशिकचे राजकारण

केदा आहेरांच्या मनसुब्यांवर पाणी !

नाशकातील उमेदवारी साठी केदा आहेरांच्या उमेदवारीचा विचार न झाल्याने कार्यकर्ते नाराज !


  1. वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा, ता. ०२ मे २०२४ नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटेल व तेथुन भाजपा नेते केदानाना आहेर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा केदानाना व त्यांचे कार्यकर्ते बाळगून होते. परंतू तेथे शिंदे गटाला उमेदवारी देण्यात आल्याने केदानाना समर्थक कार्यकर्त्यांमधे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा थेट फटका नाशिक, दिंडोरी सह धुळे लोकसभेतही काही अंशी बसू शकतो.

बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices

गेल्या चाळीस वर्षांपासून केदा आहेर हे भाजपात सक्रिय आहेत. स्वर्गिय डॉ. डी. एस. आहेर यांच्या सोबत संघटनेचे काम करत असतांना जिल्हाभरात त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केलेले आहे. नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असतांना त्या माध्यमातून मोठा जनसंपर्क त्यांनी तयार केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली आहे.
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवडणूकीत देखील सक्रिय सहभागी होऊन मोठे मताधिक्य मिळवून दिले. खा. भारती पवार यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. चांदवड देवळा विधानसभेतुन सर्वाधिक ८० हजारांच्या वर मताधिक्य त्यांनी मिळवून दिले होते.
तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, बाजार समिती या निवडणुकांत देखिल पक्षाची मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणण्यासाठी नेहमीच महत्वाची भुमिका राहिली आहे.
 २०१४ मध्ये केदा आहेरांनी विधानसभा लढवावी असा जनतेचा मोठा रेटा होता. परंतू स्वर्गिय डॉ. दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देऊन स्वतःच्या व जनतेच्या इच्छेला मुरड घालून चांदवड देवळा विधानसभा मतदार संघात कमळ  फुलवत आमदार राहुल आहेरांना निवडून आणण्यासाठी त्यांची महत्वाची भुमिका राहिली आहे.
असे असताना केदा नाना आहेर यांना पक्षाकडून नासिक लोकसभेची उमेदवारी मिळेल हि आशा समर्थक कार्यकर्त्यांची होती. परंतू कार्यकर्त्यांचा चांगलाच  भ्रमनिरास झाला असल्याने, कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे आता केदानाना आहेर काय भुमिका घेणार, याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!