नाशिक क्राईम

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह तिघांना बेड्या!


वेगवान नाशिक  / 

नाशिक, ता. 2 में 2024   : दसक गावाजवळील महालक्ष्मी नगर येथून उपनगर पोलिसांनी गवठी कट्ट्यासह दोघांना अटक केली आहे. याशिवाय नाशिकरोड पोलिसांनी जेलरोड परिसरातील म्हाडा कॉलनीतून गवटी कट्ट्यासह एकाला अटक केली आहे. संशयितांकडून 36 हजार रुपये किमतीचे दोन चाकू व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन चौधरी, अंमलदार विनोद लखन, शेख, पंकज कर्पे, सौरभ लोंढे यांच्या पथकाने सापळा रचला.

बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices

संशयित आले असता, त्यांना ताब्यात घेतले. संशयित ऋतिक दत्तू लोहकरे (२५, रा. इच्छामणी गणेश रो हाऊस, जुना सायखेडा रोड, जेलरोड), मयुर राजाराम हिरे (२१, रा. महालक्ष्मीनगर, दसक गाव, जेलरोड) या दोघांना अटक करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २६ हजारांची गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आली.

बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!