नाशिक जिल्ह्यात एकाच रात्री आठ दुकाने फोडली घटना सीसीटीव्हीत कैद; दुकानदारांमध्ये दहशत
नाशिक जिल्ह्यात एकाच रात्री आठ दुकाने फोडली घटना सीसीटीव्हीत कैद; दुकानदारांमध्ये दहशत
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला दि 1मे 2024
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या अंदरसूल येथील हरीओम कॉम्प्लेक्समधील तब्बल आठ पत्र्यांच्या गाळ्यांचे पत्रे वाकवून आत प्रवेश करीत चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या घटनेत हजारो रुपयांच्या मुद्देमालासह रोकड लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
येथील हरीओम कॉम्प्लेक्समधील एकूण ३६ पत्र्यांच्या गाळ्यांपैकी गुरुकृपा स्वीट्स, मौनगिरी फुटवेअर, सद्गुरु कलेक्शन, गणेश ऑटो मोबाईल, बँक ऑफ बडोदाचे ग्राहक सेवा केंद्र व बॅटरीचे दुकान आदींसह आठ दुकानांच्या पाठीमागील बाजूने पत्रा वाकवून चोरट्यांनी दुकानांच्या आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी हजारो रुपयांच्या मुद्देमालासह गल्ल्यातील हजारो रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला. यामुळे व्यापारी वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गस्त घालण्याची मागणी
अंदरसूल गावात एकाचवेळी आठ दुकानांची चोरी होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने अंदरसुलसह परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
आहे. पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे. याबाबत माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये