नाशिक क्राईम

नाशिक मध्ये गँस चा स्फोट


वेगवान नाशिक /    नितिन चव्हाण

नवीन नाशिक, ता.१.मे.२०२४- परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलिंडरचा सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यात दोघे जण जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली; मात्र आग विझविताना एक कर्मचारी जखमी झाले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

याबाबत अधिक माहिती अशी, की सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनिज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात. या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.

अंडाभुर्जी गाडीचे मालक अनुपसा व चायनिज टाऊनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या येथे होत्या. या दुर्घटनेत अमोल खांडरे हे जखमी झाले. यावेळी नवीन नाशिक अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली; मात्र त्याच वेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी राजेश हाडस हे जखमी झाले.

यावेळी अविनाश सोनवणे, के. के. पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वझरे, वाहनचालक आय. आय. काझी व एस. डी. घुगे यांनी परिश्रम घेतले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!