नाशिकचे राजकारण

नाशिककर संसरीचे गोडसे घराणे कितव्यांदा लोकसभेची उमेदवारी करतयं माहितयं का!


वेगवान नाशिक /

देवळाली कॅाम्प, ता. 1 में 2024 – नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात संसरी सारख्या अवघ्या सहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या गावातील  गोडसे घराण्याकडे तब्बल सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळावी हि निश्चितच गावासाठी अभिमानाची बाब आहे. लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत गोडसे हे चौथ्यांदा निवडणूक लढवीत असतांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गोडसे घराण्याला सहाव्यांदा मान मिळाला आहे.

दिंडोरी मतदारसंघात भाजपला धक्का

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

नाशिकच्या ग्रामीण भागात शिवसेनेचा असलेला वरचष्मा हे या उमेदवारी मागचे खरे गूढ राहिले आहे.सन १९८४ ते १९९६ दरम्यान अस्सल रांगडा गडी म्हणून स्व.राजाभाऊ गोडसे यांनी १२ वर्ष जिल्हाप्रमुख पद भूषवतांना १९९६ साली प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर ‘आपला माणूस ‘म्हणून लोकसभेची उमेदवारी केली. त्यामध्ये २ लाख २१ हजार ४४ मते मिळवीत काँग्रेसच्या डॉ.वसंतराव पवारांचा पराभव केला. तत्कालीन सरकार अठरा महिन्यात कोसळल्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा राजाभाऊंना शिवसेनेकडून उमेवारी मिळाली.

 

मात्र तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवराव पाटील ३ लाख ८१ हजार ३०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अकरा वर्षांनी तत्कालीन मनसेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य असलेले हेमंत गोडसे हे जिल्हा परिषदेत केलेल्या कार्याच्या जोरावर ‘कार्यसम्राट ‘म्हणून उदयास आले. आणि तेथूनच त्यांची खरी राजकीय वाटचाल सुरु झाली.त्यांनी जिल्हा परिषद गटात केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ २ लाख ३८ हजार ७०५ मते घेत केवळ २२ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.त्यानंतर त्यांनी शहरी मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी मनपा निवडणुकीच्या रिंगणात विजय मिळविला. आणि आपल्या कार्याच्या जोरावर मतदारांमध्ये लोकप्रिय ठरले. त्यानंतर २०१४ साली शिवसेनेमध्ये प्रवेश घेत लोकसभेची उमेदवारी करतांना तब्बल ४ लाख ९४ हजार ७३५ मते घेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पराभवाची धूळ चारली होती.

त्यानंतर २०१९ साली देखील राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार समीर भुजबळ यांना तब्बल ३ लाखाचा मताधिक्काने जिंकत दोन टर्म आधीच्या पराभवाचा वचपाही काढला होता. गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात नाशिकसाठी पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती सारख्या विविध योजना राबविल्या आहे. त्याच्या या कार्यपद्धतीमुळे दिल्ली दरबारी चांगलीच छाप निर्माण झाली आहे. दोन वेळा स्व. राजाभाऊ गोडसे व तीन वेळा हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आता पुन्हा सहाव्यांदा संसरीतील गोडसे घराण्याकडे उमेदवारी जाणार का ? अशी चर्चा रंगत असतांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा झाली.

अशातच महाविकास आघाडीकडून एकेकाळचे सहकारी राहिलेले सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे हि लढत आता कशी रंगणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. याशिवाय आगामी काळात कुंभमेळा असल्याने या उमेदवारीबाबत अनेकांकडून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा देखील करण्यात आली होती. तर भारतीय जनता पक्षाकडून देखील खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात काही वावड्या उठविल्या जात होत्या. मात्र आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून (शिंदे गट )  उमेदवारी बाबत झालेल्या पत्रकार परिषदेत हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला गेला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!