दिंडोरी मतदारसंघात भाजपला धक्का
दिंडोरी मतदारसंघात भाजपला धक्का A blow to BJP in Dindori Constituency
वेगवान नाशिक / wegwan nashik news
नाशिक, ता. 1 में 2024 – दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपच्या माजी खासदाराने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.A blow to BJP in Dindori Constituency
तुमच्या गाडीत पैसे आढळ्यास जप्त होतीलःनाशिक मध्ये पाच लाख रुपये जप्त
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून दोन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.चव्हाण हे गुरुवार (दि.२मे) आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे.
नाशिककर संसरीचे गोडसे घराणे कितव्यांदा लोकसभेची उमेदवारी करतयं माहितयं का!
चव्हाण यांनी भाजपच्या तिकिटावर निवडून येत दिंडोरी मतदारसंघाचे सलग दोन वेळेस प्रतिनिधित्व केले होते.परंतु गेल्या निवडणुकीत भाजपने चव्हाण यांना डावलून भारती पवार या नवीन चेहऱ्याला संधी दिली होती. तेव्हापासून नाराज झालेले चव्हाण पक्षापासून काहीसे दुरावलेले आहे.
यावेळी देखील त्यांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी केली करत उमेदवारी करण्याची जाहीर भूमिका घेतली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विद्यमान खासदार भरती पवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे.
मतदारसंघातून यापूर्वी महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) आणि महायुतीकडून भारती पवार (भाजप) यांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे दोघांत सरळ लढत होईल असा अंदाज होता. मात्र त्यानंतर माकपकडून जीवा पांडू गावित यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मी नाशिकमधून निवडुन येणार! मी घाबरतो का कोणाला-छगन भुजबळ
आता चव्हाण यांनी देखील अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी भाजपच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपला चव्हाण यांची मनधरणी करण्यात यश मिळेल का? हे थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे..