नाशिक क्राईम

तुमच्या गाडीत पैसे आढळ्यास जप्त होतीलःनाशिक मध्ये पाच लाख रुपये जप्त


वेगवान नाशिक / wegwan nashik news 

नाशिक, ता. 29 एप्रिल 2024-  येथील पंचवटी परिसरात तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस संपला असून, दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी लक्षणीय मतदान केले आणि काही अपक्ष उमेदवारांनी आपली ताकद दाखवली. अशातच प्रशासन सतर्क झाले असून, उमेदवारांनीही निवडणूक खर्चाच्या नियमांची पूर्तता करून निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना जिल्हा प्रशासनाकडून रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी यांनी सायंकाळी सातच्या सुमारास नाशिक मध्यवर्ती निवडणूक समितीच्या गस्ती पथकाला माहिती दिली आणि पंचवटीतील गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या राहू हॉटेलच्या चौकात एक संशयास्पद वाहन अडवून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 धर्मेश सोलिया यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.  सध्या आचारसहिंता चालु असून पैशाची मोठ्या प्रमाणात उधळण होणार याची दक्षात म्हणून पोलीस व प्रशासन सतर्क झाले आहे. जर तुम्ही जिल्ह्यात गाडी पैसे घेऊन प्रवास करत असेल तर तुमची रक्कम जप्त होणार आहे. अथवा तुम्हाला सदर रक्कम कशाची आहे हे तरी सांगावे लागणार आहे….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!