नाशिकच्या जागेचा सुटता सुटेना तिढा, महायुतीच्या डोक्यात पडलायं किडा
वेगवान नाशिक/ अरूण थोरे
नाशिक/२९ एप्रिल २०२४ नाशिक लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील २० मे रोजी मतदान होत असुन, ३ मे रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. १ एक. मे ला महाराष्ट्र दिनाची सुट्टी असुन,उद्या पासून तिनच दिवस अर्ज भरण्यासाठी आहे. तरीही महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्याने महायुतीच्या डोक्यात काय चाललंय असा प्रश्न राजकीय जानकराच्या मनात पडला आहे.
सुरवातीला हेमंत गोडसे यांना मतदारसंघात विरोध असल्याचा सर्वेचे कारण देत भाजपने गोडसेंना उमेदवारी देऊ नये असा आग्रह केला होता. भाजपचे दिनकर पाटील यांच्या उमेदवारी ची चर्चाही रंगली होती.मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कडुन भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र भुजबळांनीही येथुन माघार घेतल्याने.
आता ऊमेदवार कोण असाच प्रश्न पडला आहे. ठाणे आणि नाशिक शिवसेनाला (शिंदे) देण्याचा निर्णय झाल्या होता, मात्र द. मुंबई व पालघर या दोन्ही जागांवर भाजपासह शिवसेनेने दावा केल्याने पेच निर्माण झाला असल्याचे सांगितले जाते. महायुतीच्या सर्वच मित्रपक्षांनी दावा करून झाला असुन, पंकजा मुंडे यांनीही प्रितम मुंढेना नाशिक मधुन उभे करू असे वक्तव्य केल्याने, काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.
दुसरीकडे महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा देऊन, राजाभाऊ वाजेंना उमेदवारीही जाहीर केली असून.वाजेंनी गाठीभेटींना सुरुवात केली असताना, महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे महायुतीच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. असा प्रश्न मतदारांना पडलेला आहे.
पुढच्या दोन दिवसांत सगळं चित्र स्पष्ट होणार असल्याने, वेट न् वॉच असेच म्हणावे लागेल.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.