नाशिकःबसची धडक होऊन एकचा मृत्यू
वेगवान नाशिक / wegwan Nashik news
नाशिक, ता. 29 एप्रिल 2024 – नाशिकरोड येथील बंगाली बाबा परिसरात भरधाव बसने दिलेल्या धडकेत अपघाता होऊन 41 वर्षीय पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या अपघाताप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Nashik: One person died after being hit by a bus
महायुतीमध्ये गुंता असतांना शिवसेना गटाकडून शांतीगिरी महाराजांचा उमेदवारी अर्ज
अशोक तानाजी सोनवणे (वय 41, रा. देवळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे या पादचाऱ्याचे नाव असून तो शनिवारी (दि. 27) सायंकाळी बंगाली बाबांजवळील विस्वा हॉटेलसमोरून पायी जात होता. तेव्हाच बाबा चौधरी बिल्डिंग परिसरात भरधाव वेगात असलेल्या एमएच 20 बीएल 3311 क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना धडक दिली. दुर्दैवाने या घटनेत सोनवणे यांना जीव गमवावा लागला.
आजचे राशी भविष्यः या लोकांनी सावध रहाण्याची गरज ! Today’s horoscope
याप्रकरणी संदीप फणसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालक संजय लक्ष्मण भांबड (रा.चास ता. सिन्नर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक हे करीत आहेत.