नाशिक ग्रामीणशेती

बळीराजाला यंदा दमदार पावसाची अपेक्षा 


 

वेगवान नाशिक/समीर पठाण 

लासलगाव/29 एप्रिल 2024

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात बळीराजाचे मान्सूनपूर्व शेती कामे अंतिम टप्प्यात आले असून आता बळीराजाला जुन महिन्यातील चांगल्या दमदार पाऊसाची अपेक्षा आहे.शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जरी जून मध्ये सुरू होत असला तरीही त्यांची शेतीमशागतीची पूर्वतयारी मात्र एप्रिलच्या पंधरवड्यापासून सुरू होते व मे च्या पंधरवड्याच्या आत म्हणजेच एक महिन्यात पूर्ण करण्यात येते.

 

सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत.त्यातच राज्यात अधून मधून अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या रूपाने हजेरी लावणारा पाऊस गेल्या वर्षी सारखा पुढील जून,जुलै महिन्यात दांडी मारतो की काय अशी भीती सुद्धा शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी सुद्धा भारतीय हवामान विभागाने खूप पाऊस पडणार असं भाकीत केले होते पण झालं उलटच संपूर्ण राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली.विषेशता ग्रामीण भागातील जनतेला या दुष्काळाला सामोरे जावे लागलं. आणि गेल्या आठवड्यात हवामान विभागाने पुन्हा या वर्षी खूप पाऊस पडेल अशी माहिती दिली.या वृत्तामुळे पुन्हा एकदा शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत 

 

शेतकरी शेतीची मशागत करून तयार झालेल्या शेतात विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतो निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना असते सध्या शेतीच्या कामांना ग्रामीण भागात नांगरणी व वखरणी ट्रॅक्टरच्या साह्याने ढेकळे फोडून अशी मशागतीचे कामे सुरू झालेली आहेत शेती व्यवसायात शेतकऱ्याने जरी आधुनिकतेची कास धरली असली तरी देखील शेतीच्या कामासाठी बैलजोडीची गरज भासत असते.

 

या वर्षाच्या सुरवाती पासून शेतकऱ्याच्या कुठल्याच शेतीमालाला उत्पादन खर्च इतकाही भाव न मिळाल्याने तो आर्थीक संकटात सापडला आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही असे शेतकरी बैल जोडी खरेदी करण्यासाठी बैल बाजारात फिरताना दिसत आहेत.त्याचबरोबर बैल जोडी चे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे शेतकरी राजाची बैलजोडी घेण्यास दमछाक होत आहे.

 

 

“गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगला पडण्याची आशा शेतकरी बाळगून आहे.पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच शेतीची कामे संपवायला हवी तसेच दुधाळ जनावरांना व बैलांना लागणारी कोरडी वैरण घोठ्यात साठवून ठेवायला सुरुवात केली जात आहे.”

 

सुनील गवळी शेतकरी

ब्राह्मणगाव विंचूर


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!