निफाड मध्ये आगीत शेतक-याचे लाखो रुपयाचे नुकसान व्हिडीओ
वेगवान नाशिक / अरुण थोरे
निफाड,ता. 28 एप्रिल 2024 – धानोरे ता.निफाड येथुन एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. येथे लागलेल्या आगीत जनावरांचा मुरघास व शेती उपयोगी साहीत्य जळुन खाक झाल आहे.
लासलगाव: महीलेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या एकास अटक.
मी नाशिकमधून निवडुन येणार! मी घाबरतो का कोणाला-छगन भुजबळ
आज दि.२८ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास रखमाबाई राजाराम वाटपाडे यांच्या गट नंबर १५१ या शेतात आग लागली. या आगीत शेती उपयोगी असणारे दोन एकराचे बांबू, ड्रीप, टोमॅटोची तार, कुट्टी यंत्र, बैलगाडी, पिस्टन मशीन, जनावरांचा चारा व मुरघास पिशव्या आदी साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र स्थानिक चौकशी अंती अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचे सांगितले आहे.
Realme सर्वात स्वस्त फोन 5G मोबाईल लॅान्च, सोबत 50 MP कॅमेरा