नाशिक क्राईमनाशिक ग्रामीणशेती

लासलगाव: महीलेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या एकास अटक.


वेगवान नाशिक/ अरूण थोरे

लासलगाव/ २८ एप्रिल २०२४

 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

लासलगाव येथील कविता भागवत गरड वय (३२) (रा. कॉलेज रोड, इरिगेशन कॉलनी लासलगाव) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मयत कविता यांच्या सासु मिराबाई गरड यांच्या फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी विलास काळू खैरनार याच्या विरोधात लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

  

मयत कविता यांची सासू मिराबाई अण्णा गरड (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादीत, माझी सून कविता गरड हिने आरोपी विलास काळु खैरनार रा.संजयनगर याच्याकडे हात उसनवार दिलेले पैसे मागितले वरून त्याने मयत कवितास वाईट साईट शिवीगाळ करुन हाता-चापटीने मारहाण केली तसेच पुन्हा माझ्याकडे पैसे मागितले तर तुला मारुन टाकेन असा दम दिला.

यापूर्वी देखील पैसे मागितल्याचे कारणावरून तिला शिवीगाळ दमदाटी केली होती. त्याचे या सततच्या त्रासाला कंटाळुन मयत कविता यांनी तिचे राहते घराचा दरवाजा आतुन बंद करून आतून कडी लावुन स्वयंपाक घराजवळील सिमेंटच्या चौकटीला साडीचे सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास खैरनार याच्या विरोधात गु.र.नं. १०२/२०२४ भा.द.वि का. कलम ३०६,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली पो.उपनिरीक्षक मारुती सुरासे अधिक तपास करीत आहेत.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!