नाशिक क्राईम

लासलगाव ग्रामपंचायत मधील महिलेची आत्महत्या


वेगवान नाशिक / 

लासलगाव . ता. 24 एप्रिल 2024 – येथील एरिगेशन कॉलनी कॉलेज रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कविता भागवत गरड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
या माहितीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक घोलप करत आहे.

मयत कविता हीचे पती देखील लासलगाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते. त्यांचा देखील दोन वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. मयत कविताच्या पश्चात दोन लहान मुले व एक लहान मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

या माहितीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक घोलप करत आहे. मयत कविता हीचे पती देखील लासलगाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते. त्यांचा देखील दोन वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. मयत कविताच्या पश्चात दोन लहान मुले व एक लहान मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!