वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव /wegwan nashik
येवला, ता. 4 एप्रिल 2024 राज्यात सर्वत्र कमी पाऊस झाल्याने अनेक तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे . पहिल्या यादीत संपूर्ण येवला तालुक्यातील पाचही मंडळ दुष्काळी जाहीर करण्यात आली आहेत.
सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यात कुठेच शेतिकाम मजुरीचे काम उपलब्ध नाही. त्यामुळे स्वाभाविकच मजूर पोट भरण्यासाठी इतरत्र स्थलांतर होण्याचे विदारक चित्र असताना मात्र स्वतःच्या भोजन कक्षासाठी शासकीय कार्यालयात लाखो रुपये खर्च करण्यात मश्गूल असलेले गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांचे लहरी स्वभावामुळे मजुरांना कोणतीच ग्रामपंचायत रोजगार हमी योजना अंतर्गत गावात काम उपलब्ध करून देत नसल्याचे चित्र आहे.
मागेल त्याला रोजगार हमी योजनेतून मजुरांना त्वरित काम उपलब्ध न करून दिल्यास सोमवारी तालुक्यातील मजुरांसह पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा पंचायत समिती गटनेंते डॉ मोहन शेलार यांनी केला आहे.
2 महिन्यापूर्वी नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी नियमांच्या नावाखाली बाऊ करत तालुक्यातील सर्वच रोजगार हमीची कामे बंद केलेली आहेत. शासनाच्या व्यतिरिक्त स्वतः एक लिंक तयार करून प्रत्येक ग्रामसेवक, रोजगार सेवक यांना सदर लिंकवर रोज सुरू असलेले कामाचे फोटो टाकायचे बंधन केले आहे. शिवाय कामात काही कसूर आढळला तर रोजगार हमी कायद्याखाली कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामसेवकांना दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंचायत समिती प्रशासन गटविकास अधिकारी यांच्या भीतीने त्रस्त झाले आहे.
मागील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर मालेगाव तालुक्यात 1994,नांदगाव तालुक्यात,
939, निफाड तालुक्यात 1058, सुरगाणा तालुक्यात 4026 इतके मजुरांना काम मिळाले तर येवला तालुक्यात केवळ 176 लोकांना मजुरीचे काम उपलब्ध झाले आहे.
गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांचे लहरी स्वभावामुळे हजारो मजूर मजुरीपासून वंचित राहत असून सदर प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयात निधी मंजूर नसताना ,अंदाजपत्रक नसताना, निविदा नसताना आचारसंहिता काळात गटविकास अधिकारी यांचे दालनात भोजन कक्ष कोणाचे मेहरबानीने झाला याची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मोहन शेलार यांनी केली आहेदुष्काळी तालुक्यात लहरी गटविकास अधिकारी यांचेमुळे मजुरांना काम नाहीत
मजुरांचे स्थलांतर हे चिंताजनक
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये