पाण्याच्या शोधात मुक्या प्राण्याचा बळी
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. २४ एप्रिल २०२४ –
येवला तालुका उत्तर पूर्व भागामध्ये हरणांच्या मृत्यूचे सत्र सर्रास सुरू आहे अन्नपाण्यासाठी हरणांचे वणवण भटकंती सुरू
दोन घोट पाण्यासाठी हरणांना मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे मोकाट कुत्र्यांचे हल्ले रस्ता अपघात सराईत शिकाऱ्यांचे हल्ले असे अनेक प्रकार येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागांमध्ये सर्रास सुरू असताना वन विभाग बघ्याची भूमिका घेत आहे
येवला तालुका उत्तर पूर्व भागामध्ये ममदापूर संवर्धन राखीव उदयास आली परंतु ममदापूर संवर्धन राखीव चा एक कवडी मात्र ही उपयोग या प्राण्याला होत नाही उलट ममदापूर संवर्धन राखीव च्या नावाखाली हरणांची हेळसांड सुरू आहे
याकडे त्वरित गंभीर पावले उचलण्याची गरज आहे याकडे वन विभाग गांभीर्याने बघणार का अशी खंत वन्यजीव प्रेमी प्रवीण आहेर यांनी व्यक्त केली
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये