नाशिक ग्रामीणनाशिकचे राजकारण

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेद्वारांची उमेद्वारी की भोकडी!


वेगवान नाशिक /  सुनिल घुमरे

दिंडोरी,ता. 24 एप्रिल 2024 – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेली पंधरा वर्षे हा मतदारसंघ सत्ताधारी म्हणजे भाजप भारतीय जनता पार्टीचा ताब्यात असून या मतदारसंघात विविध विकास कामे प्रलंबित असून मतदारसंघांमध्ये हिंदू महादेव कोळी कोकणा मराठा व इतर अशा जातीय समीकरणाचे मतदार असून या मतदारसंघात आघाडीच्या वतीने श्री भास्कर बगरे यांना वरिष्ठ नेतृत्व श्री शरद पवार राहुल गांधी व उद्धव बाळासाहेब ठाकरे मी उमेदवार म्हणून घोषित केले असून भास्कर भगरे यांचा गेल्या दोन महिन्यापासून ग्राउंड लेव्हलवर प्रत्येक मतदारांशी संपर्क किंवा प्रत्येक गावातील पुढारी.वर्गाशी संपर्क करण्याचे काम सुरू असून प्रचारात आघाडी घेतली आहे तर युतीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या कामांच्या संदर्भातील कामे मंजूर असले बाबत व पूर्णत्वाच्या दृष्टीने जात असल्याचे विविध फलक लाऊन विकास कामांचे उद्घाटने किंवा लोकार्पण सोहळा केला असून त्याही आपल्या परीने मतदार संघात फिरत असून मतदारसंघात द्राक्ष कांदा डाळिंब पेरू पॉलीहाऊस फुले गुलाब शेवंती झेंडू आणि टोमॅटो भाजीपाला सोयाबीन कडधान्य यासारखे विविध प्रकारचे उत्पन्न घेतले जाते .

 दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने भारतामध्ये अग्रगण्य असलेली कांद्या संदर्भातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बाजार समिती वणी दिंडोरी बाजार समिती देवळा उमराणे बाजार समिती नांदगाव मनमाड बाजार समिती या ठिकाणी कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते व मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी संबंधित मार्केटमध्ये येत असतो परंतु निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने तसेच द्राक्षा बाबत वाढवलेले कर वेळोवेळी द्राक्ष किंवा भाजीपाला सुरू झाल्यानंतर होणारी निर्यात बंदी किंवा बॉर्डर वरची अडवणूक यामुळे या भागातील मतदार शेतकरी कामगार यांची भारतीताई पवारांवर सध्या तरी नाराजी असल्याचे चित्र जाणवत असून मोदींचा करीश्मा चालतो कि इतर कोणी बाजी मारते बार्डर चा मुद्दा शेतीमाल वाहतूक अडथळे व रसत्या प्रश्न यानिमित्ताने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नसताना व त्यांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवताना वरिष्ठांशी केलेला पत्रव्यवहार किंवा मागणी या दोन्ही बाबींमुळे खुशी व गम असा दोन्ही प्रत्येक बघण्यात येत असून विकासकामांबाबत नाशिक दिंडोरी कळवण हा दोन राज्य दोन प्रमुख देवस्थाने यांना जोडणारा मुख्य रस्ता असतानाही या रस्त्याबाबत ठेकेदार किंवा वरिष्ठ पातळीवर न घेणाऱ्या अडचणीमुळे ग्रामीण भागातील नाराजी या ठिकाणी असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ व केंद्रीय आदिवासी जनजाती राज्यमंत्री हे असतानाही हा प्रमुख मार्ग न झाल्याने काहीसा नाराजीचा सूर असून विद्यमान खासदार यांनी विविध ठिकाणी लावलेले कामाचे बोर्ड व त्यावर होणारे आरोप प्रत्यारोप व स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये हे नेमके काम कोणाचे यावर असलेला एकमेकाचा हक्क या सांगण्यामुळे मतदार दोलाईमान स्थितीत असून नेमके काम कोणाचे व कामाचा दर्जा यावर खऱ्या अर्थाने विद्यमान खासदारांना जनता मध्ये टाकणार तर भास्करराव भगरे दिंडोरी पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पदांवर काम करत असताना आपला पेशा शिक्षकी असूनही जनतेशी नाळ जोडून असल्याने व त्यांच्यावर वरदहास्त असणारे वरिष्ठ नेतृत्व माननीय शरद पवार जिल्हा नेते श्रीरामजी शेटे दत्तात्रय पाटील कोंडाजी मामा आव्हाड यांच्यामुळे आज तरी त्यांचे पाढे जड असल्याचे चित्र बघावयास मिळते.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

 पुढील पंधरा दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर कोणता उमेदवार आपल्या मतदारांना कशा पद्धतीने आश्वासने देऊन त्याची मते आपले पदरात पाडून घेण्यासाठी यशस्वी ठरेल यावर मात्र दिंडोरी लोकसभेचा खासदार कोण हे गणित बसणार असून यात प्रामुख्याने आघाडी सोबत असणारे व या मतदारसंघात सुरगाणा व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आपली ताकद एकसंध दाखवून नेतृत्व करणारे कम्युनिस्ट नेते माजी आमदार जीवा पांडू गावित यांनीही या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या निर्णयाच्या विरोधात उतरून आपल्या बरोबर असलेल्या जनशक्तीच्या भरोशावर या मतदारसंघात कोणतेही परिस्थितीत वरिष्ठ पातळीवरून आघाडीचे तिकीट आपणास मिळावे अशा प्रकारची तयारी दाखवली असून न मिळाल्यास या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिला असून त्यामुळे या मतदारसंघात हिंदू कोकणा व व आदिवासी अशा प्रकारचे जातीय समीकरणाची लढत होण्याची दाट शक्यता असून त्यातच त्यांनी लॉन्ग मार्च मुंबईला नेलेला मोर्चा आपल्या भागातील गरजू कामगार शेतकरी कष्टकरी मजूर यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई नाशिक दिंडोरी सुरगाणा कळवण निफाड सह जिल्ह्यातील सर्व कम्युनिस्टंना एकत्र करून आपली ताकद व त्यावर आपल्या मतदारसंघातील जनतेची कामे करण्यासाठी त्यांनीही या ठिकाणी कंबर कसली असून मतदारसंघात मोठी उलथापालत होण्याची शक्यता असून या ठिकाणी गेली पंधरा वर्षे भारतीय जनता पार्टीची ताकद नसतानाही शिवसेना सोबत सर्व मित्र परिवार यांना बरोबर घेऊन या मतदारसंघांमध्ये आपले प्रतिनिधित्व व एअर ॲम्बुलन्स खासदार म्हणून ओळख पडले असलेले हरिश्चंद्र चव्हाण यांनीही उमेदवारीसाठी दावा केला असून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे व यावेळी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच ही खूणगाट बांधली.

 अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात असताना व आपल्या जीवाची परवा न करता डॉक्टरांनी मतदानाला जाऊ नये हे सांगितलेले असतानाही तसेच लाखो रुपयांचे आम्ही दाखवूनही आपली पक्षनिष्ठा कायम ठेवून अटल बिहारी वाजपेयी यांना मतदान करण्यासाठी नाशिक ते दिल्ली व संसदेत मतदानासाठी प्रत्यक्ष हजर राहून मतदान केले असून पक्षाबाबत असलेली असता त्यांनी दाखवून दिली त्याही नंतर मागील काळात उमेदवारीसाठी आग्रह असताना ऐन वेळेवर या मतदारसंघातील माजी आमदार धनराज माले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने व राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य भारतीताई पवार यांनी ऐन वेळेवर भारतीय जनता पार्टीचे संकटमोचन गिरीश महाजन यांना भेटून भारतीय जनता पार्टीत पक्षांमध्ये प्रवेश करून आपली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवली व निवडून येण्यात या यशस्वी ठरले असून तेव्हापासून नाराज झालेले हरिश्चंद्र चव्हाण हे आपल्या परीने मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून यावर्षी मात्र कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवायची व विजयी व्हायचे
अशी खुणगाट बांधले.

उमेदवारी करण्याबाबत पूर्णपणे तयारी केली असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे चिरंजीव समीर चव्हाण यांनी सांगितले असून आपल्याला उमेदवारी करण्याबाबत जनतेचा आग्रह असून विद्यमान खासदार भारतीताई पवार यांना आपली यापूर्वी कधीही आठवण न आल्याने व पक्षातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम पवार या करत असल्याबाबत हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून कोणतेही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे ही उमेदवार उमेदवारी करणार असल्याबाबत चर्चा होत असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या गटाचे भास्कर भगरे कम्युनिस्ट व काँग्रेस यांनी या ठिकाणी भास्कर भगरे यांची उमेदवारी घोषित करून प्राचार्य शिगेला पोहोचला .

भारतीय जनता पक्षाचे शिवसेना शिंदे गट उमेदवार ना भारतीताई पवार यांचाही मतदारसंघात फेरी झाली असून मा खा हरिश्चंद्र चव्हाण यांनीही आपल्या मतदारसंघात तालुक्यांमध्ये जुने जाणते व पदाधिकारी विविध पक्षाचे मित्र व सामाजिक मंडळे तसेच संत श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तर अधिकारी परमपूज्य 1008 महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांची ही भेट घेऊन त्यांच्याही विचाराचा आपण असल्याचे व बाबाजी परिवाराची मदत आपणास व्हावी या दृष्टिकोनातून भेट घेतली असून त्यांचेही स्पर्धेत उतरल्यास मतदारसंघातील चित्र बदलणार असून कॉम्रेड नेते श्री जीवा पांडू गावित यांनीही आपली मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीची आकडेवारी या वेळेला तिच्याही पुढे जाऊन या मतदारसंघात कोणतेही परिस्थितीत आपण दिल्ली घटना असे सुतवाच केले असून त्या पद्धतीने त्यांनीही कामाचे व मतदारांचे भेटीचे समीकरण जोडले असून उर्वरित वंचित आघाडी आणि अपक्ष हे जर राहिले तर या मतदारसंघात पंचरंगी ते त्याहून जास्त अशी लढत होणार असल्याने मतदारसंघात आपणच खासदार होऊ असा दावा सांगणारे उमेदवार नेमके कोण दिल्ली गाठी हे आगामी सात तारखेनंतर चित्र काहीसे स्पष्ट होणार असल्याने या मतदारसंघात चुरस मात्र वाढणार असल्याचे व मतदार राजा या ठिकाणी मात्र सगळ्यांवरच नाराज असल्याचे आज तरी दिसुन येत आहे. 

दिंडोरी हा तालुका धरणांचा तालुका असताना तालुक्यातील धरणे असलेले गावे किंवा तालुक्यातील मोठमोठी गावे यांना आजही पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत असून फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासने देणारे व निवडणुकीनंतर गायब होणारे किंवा ठराविक लोकांशी संपर्क ठेवणारे लोकप्रतिनिधी आम्हाला नकोत आम्हाला आमच्या तळागाळात काम करणारा आमच्यामध्ये मिसळणारा हक्काचा माणूस या ठिकाणी खासदार म्हणून गेला पाहिजे अशी मतदार राजाची अपेक्षा आहे या ठिकाणी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आवश्यक वेळेला आवश्यक ती औषधे उपलब्ध नसतात तर कर्मचारी उपस्थित असून ते अमुकच वेळेत तुम्ही ओपीडी ला आले पाहिजे किंवा वेळ संपली सायंकाळी या सकाळी लवकर या अशा प्रकारची सर्वसामान्य नागरिकांना उत्तरे देणारे डॉक्टर अधिकारी तालुक्यात काम करणारे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी तसेच ग्रामीण भागात महत्त्वाच्या समस्या भेडसावत असताना त्यात विजेचा प्रश्न सबस्टेशन असूनही लोड शेडिंग नसतानाही लोड शेडिंग इंडस्ट्रीज शेतकऱ्याच्या जमिनीवर उभे राहून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी विज उपलब्ध होते व इंडस्ट्रीजवाल्यांसाठी 24 पुरवठा अखंडित सुरू असतो तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवावर सर्व उद्योग राजकीय नेते भारत हा 80% शेतीप्रधान देश असताना शेतकऱ्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसतो पीक विमा काढला तर तो मंजूर होत नाही मंजूर झाला तर तो मिळत नाही.

ठिबक किंवा शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या कृषीच्या वेगवेगळ्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला लकी ड्रॉ किंवा इतर अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना तात्काळ अंमलबजावणी करणारा आरोग्य पाणी प्रश्न लघुपाटबंधारे प्रश्न शिक्षण महसूल भूमी अभिलेख या कार्यालयात वारंवार चकरा मारून आपल्या कामाला न्याय मिळत नसल्याचे चित्र या ठिकाणी मतदारांनी बोलून दाखवले आहे त्यामुळे या सर्व कामांचा निपटारा करणारे व सर्वसामान्य जनतेच्या साठी हक्काने 24 तास खासदार कुठेही असो परंतु भ्रमणध्वनी द्वारे सामान्य जनतेला संवाद साधणारा असा माणूस किंवा असे लोकप्रतिनिधी या ठिकाणाहून निवडून देण्याची मतदारांची तयारी असून पैसा किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारालाच आपण मते टाकणार असून तोच उमेदवार या ठिकाणी आपणास न्याय देऊ शकतो म्हणून निवडणुकीचा निकाल मात्र पक्ष उमेदवारी तिकीट व नामनिर्देशन पत्र अंतर माघारीच्या दिवशी काही प्रमाणात स्पष्ट होणार असल्याने आगामी काळात काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे कोणाला कात्री मारले जाते की कोणाला मानसन्मान दिला जातो यावरही अजून उमेदवाराचं भव्यीतव्य अवलंबून आहे

दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या बरीच  नावे चर्चेमध्ये आहे. जर एवढे जण उभे राहणार असल्याच्या वावड्या उठत असतील किंवा खरोखर उभे राहणार असतील तर कोण कोणाला पाडणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या या दिंडोरी मतदार संघामधून बरेच उमेदवार जे आहे ते उभे राहणार आहे असे चित्र निर्माण झाले आहे.  हे खरोखर उभे राहणार की भारतीताई पवार किंवा भगरे यांना भोकाडी आहे. हा प्रश्न मात्र जनतेला पडलेला आहे.


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!