नाशिक क्राईमनाशिक ग्रामीण

कांदा लिलावास आलेला तरूण वाहनासह बेपत्ता


वेगवान नाशिक/अरूण थोरे
लासलगाव/२३ एप्रिल २०२४

लासलगाव येथे बाजार समितीत कांदा विक्रीस आलेला तरूण बेपत्ता झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली आहे. पाटोदा (ता.येवला) येथील समाधान अर्जुन घोरपडे (वय २९) हा लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीस आला असता लिलावानंतर वाहनासह गायब झाला आहे.

याबाबत त्याचा चुलत भाऊ राहुल ज्ञानेश्वर घोरपडे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता समाधान अर्जुन घोरपडे रा.पाटोदा ता.येवला हा त्याची महिंद्रा जीतो (एम.एच.१६ ए.जी.९०५१) या मालवाहतूक गाडीत घरचे कांदे घेऊन लासलगाव बाजार समितीत विक्रीस आला. कांदा लिलाव झाल्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास त्याची चुलतभाऊ राहुल याच्याशी भेट झाली व मी घरी जातो असे सांगितले मात्र, मी सायंकाळी घरी आल्यावर वडील अर्जुन घोरपडे यांनी समाधान अजून घरी आला नाही तू त्याला पहिले का? असे विचारले असता तो मला भेटला व घरी जातो असे सांगितले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

नंतर त्याच्या मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. त्यानंतर मी, माझे मामा गोपाल श्रीधर मेमाणे व समाधान याचे वडील अर्जुन घोरपडे आम्ही पाटोदा, लासलगाव पंचक्रोशी तसेच नातेवाईकां- कडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

त्याचा रंग गोरा, चेहरा उभट, बांधा मध्यम, दाढी काळी व वाढलेली, उजव्या कानात सोन्याची बाळी, हातात चांदीचे ब्रासलेट, अंगात सफेद रंगाचा शर्ट व रंगाची पॅन्ट, पायात बुट असे वर्णन आहे. सोबत पाढरे रंगाची महिंद्रा जितो मालवाहतुक गाडी क्रं. एम. एच. १६ ए. जी. ९०५१ आहे असे म्हटले आहे. अधिक तपास स.पो.नि भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!