बागलाण तालुक्यात 35 प्रवाशांनी भरलेली बस पेटली व्हिडीओ

वेगवान नाशिक / wegwan Nashik news
सटाणा, 23 एप्रिल 2024 – अतुल सुर्यवंशी/वेगवान नाशिक
बागलाण :तालुक्यातील सटाणा प्रतापुर या मार्गावर धावणारी बस खिरमानी फाट्याजवळ थांबली असता अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी घडली.
सदर बस खिरमानी फाट्यावर थांबली असताना अचानक पेट घेतल्याचे चालक यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंग सावधान दाखवत बस मधील ३५-४० प्रवासी सुखरूप बाहेर पडले.
चालक व वाहक यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग आटोक्याच्या बाहेर गेली असता सटाणा येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले पण तो पर्यंत बस जळून खाक झाली होती.आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.