नाशिक ग्रामीण

नाशिकः मोटारसायल-कंटेनर भीषण अपघात, तीन जण ठार


वेगवान नाशिक

सिन्नर, ता 21 एप्रिल 2024 – संगमनेर तालुक्यातील निमोणे गावाजवळ कंटेनर आणि पल्सर मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत आदिवासी कुटुंबातील तीन तरुणांना जीव गमवावा लागला. मृतांपैकी दोघे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील रहिवासी आहेत, तर एक अकोले तालुक्यातील गरदानी येथील आहे.

नांदूर-शिंगोटे लोणी रोडवरील निमोणे गावाजवळ शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. कंटेनर आणि पल्सर मोटारसायकलची धडक झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. हा अपघात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी कंटेनर ताब्यात घेऊन घटनेची माहिती गोळा केली आणि अहवाल दाखल केला.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

अपघातातील मृतांमध्ये कुंडली पंढरीनाथ मेंगाळ (वय 30), युवराज धोंडिबा मेंगाळ (वय 29), आणि नांदूर-शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील संदीप सोमनाथ इगावले (रा. गर्दणी जि. अकोले) यांचा समावेश आहे. तिघे मोटारसायकलवरून जात असताना कंटेनर (नोंदणी क्रमांक GJ 15 AV 6656) आणि पल्सर मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH 15 HK 5304) यांच्यात धडक झाली. दोन्ही वाहनांच्या जोरदार धडकेत तिन्ही दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!