जिल्हा परिषद शाळेच्या निरोप समारंभाला चक्क स्वित्झर्लंडचे पाहुणे
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा, ता. २० एप्रिल २०२४
मोठं मोठी कॉलेज, महाविद्यालयात होणाऱ्या निरोप समारंभाला परदेशी पाहुणे येतात व त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात हे नेहमीच आपल्या कानावर येत असत. मात्र, वस्ती शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाला फिफ्नार ग्रुप स्वित्झर्लंडचे अध्यक्ष मार्कस व्हेंस्टर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याने या शाळेची सर्वत्र चर्चा होत आहे.
देवळा तालुक्यातील खामखेडा सारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची फांगदर वस्ती शाळा नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत असते. ज्या प्रमाणे कॉलेज महाविद्यालयात निरोप समारंभ होतात त्याच प्रमाणे आपल्या चौथीच्या विद्यार्थ्यांचा देखील निरोप समारंभ थाटामाटात व्हावा, तोलामोलाचे पाहुणे आणावे असे नियोजन झाले आणि शिक्षकांनी चक्क स्वित्झर्लंडच्या पाहुण्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्कस व्हेंस्टर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, आपले स्वप्न हे नेहमी मोठी असली पाहिजे. हीच स्वप्न आपलं जिवन बदलत असतात. आपल्या हृदयात हि स्वप्न खरी करण्याची ताकद असली व कष्ठ करण्याची हिंमत ठेवली कि माणूस मोठं होण्यासाठी कुठलीही शक्ती आडवी येत नाही. मला भारत देश माहिती नव्हता. शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला येऊन मी अशाच छोट्याश्या पन्नास मुलांच्या शाळेतून शिकून पुढे आलो. स्वप्न मोठी पाहून कष्ट केलीत व जग बदलण्याची ताकद ठेवली म्हणून यशस्वी झाल्याचे त्यांनी विविध उदाहरणातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक मा. डॉ. प्रकाश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना आनंदानं अभ्यास करा, पुस्तकांशी मैत्री करा, थोरांचा आदर करा, खूप खेळा, जीवनाचा आनंद लुटा, छंद जोपासा या पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख गंगाधर लोंढे, सोनवणे फाउंडेशनशे संचालक बी. वाय. सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यध्य रविंद्र शेवाळे, उपाध्यक्ष दिपक मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संजय गुंजाळ यांनी प्रस्तावना केली. विध्यार्थी जाई मोरे, तनिष्का शेवाळे, जुई मोरे, निखील आहेर, पियुष शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास निंबा शेवाळे, सोनजी पवार, नानाजी पवार, वैभव हिरे, जगदीश मोरे, दिगंबर देवरे, गणेश शेवाळे, भूषण आहेर, बबन सूर्यवंशी मुख्याध्यापक संजय गुंजाळ , खंडू मोरे व विध्यार्थी उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.